Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

mosami kewat by mosami kewat
April 12, 2026
in बातमी, सामाजिक
0
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
       
भंडारा : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात जिलाध्यक्ष तनुजा अमित नागदेवे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समतेच्या लढ्याची आठवण करून दिली. फुले यांच्या आयुष्यातील काही घटनांचा उल्लेख करत त्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि जातीय विषमता याविरोधात त्यांनी दिलेल्या लढ्याची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली.

तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्यालाही विशेष अधोरेखित करण्यात आले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाज परिवर्तनाची दिशा देणाऱ्या या दांपत्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. “विद्येविना मती गेली…” हा महात्मा फुले यांचा संदेश यावेळी उपस्थितांना स्मरण करून देण्यात आला.

कार्यक्रमाला चारूशीला मेश्राम, चित्रा मेश्राम, जोशना खोबरागडे, बबिता राऊत, यादोराव गणवीर, किशोर तागडे, वैभव मोटघरे, गणेश गजभिये, अमित नागदेवे, केवळराम उके, प्रेमचंद खोबरागडे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा आणि शिक्षण व समतेचा संदेश समाजात पोहोचवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. 

Tags: bhandaraMaharashtrapoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

Next Post

नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
September 1, 2026
0

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...

Read moreDetails
अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

September 1, 2026
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home