Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
April 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
       
Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. AI च्या माध्यमातून तयार होणारे पोस्टर्स आणि बॅनर्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात असून, हा प्रकार चळवळीच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जगभरात बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी सुरू असताना AI निर्मित सामग्रीद्वारे त्यांच्या विचारांची मोडतोड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात काही ठिकाणी बाबासाहेबांच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रयत्न होत असून, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून बी. एन. राव यांचे नाव पुढे करून खोटा प्रचार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कडून बाबासाहेबांचे विचार समरसतावादी असल्याचा अजेंडा राबवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पूर्वी बाबासाहेबांना विरोध करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व तथाकथित पुरोगामी गटांकडूनही त्यांच्या विचारांचे चुकीचे प्रतिनिधित्व केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या पिढीतील आंबेडकरी तरुणांनी बाबासाहेबांचे मूळ लेखन, विशेषतः Writing and Speeches मधील विचार वाचण्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ओरिजिनल साहित्य बाजूला ठेवून AI निर्मित मजकूर आणि चित्रांचा प्रसार वाढत असल्याने हा प्रवाह थांबवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबासाहेबांचे हजारो मूळ फोटो उपलब्ध असताना AI तयार चित्रांचा अट्टहास करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रवृत्तीमुळे स्थानिक कलाकारांच्या कलेवर आणि उपजीविकेवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बाबासाहेबांचे खरे विचार आणि मूळ स्वरूप जपण्यासाठी सर्वांनी त्यांच्या ओरिजिनल फोटोंचाच वापर करावा आणि भीम जयंती उत्साहात साजरी करावी, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले आहे.

Tags: AIArtificial IntelligenceBhim jayantiDr Babasaheb AmbedkarDr Babasaheb Ambedkar jayantiindiaMaharashtrapuneSujat Ambedkar
Previous Post

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

Next Post

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home