अकोला : वंचित बहुजन आघाडीचे तेल्हारा तालुक्यातील कार्यकर्ते संदीप गवई यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विजयासाठी ते सायकलवर फिरून गावागावांत प्रचार करताना दिसत आहेत. अकोल्याच्या घरघरांत प्रेशर कुकर पोहचवण्याचा त्यांनी निर्धार केला असून, बाळासाहेब आंबेडकर यांना संसदेत पाठवूया, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या देशात आणि राज्यात वाहत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष, नेते आणि कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून प्रचार करत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गवई हे देखील मागे नाही. वंचितच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे अकोल्यात वंचित बहुजन आघाडी परिवर्तन घडवणार असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला असून, प्रेशर कुकर या वेळी इतिहास घडवणार असा विश्वास देखील मतदारांनी व्यक्त केला आहे.