पुणे : वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर शाखेने ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर यशस्वी ट्रेकिंगचे आयोजन केले होते. पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये सलोखा आणि मैत्रीची भावना वाढवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या ट्रेकमध्ये सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, फुले-शाहू-आंबेडकर चळवळ, पक्षाची ध्येयधोरणे तसेच एकमेकांच्या आवडीनिवडी यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. सिंहगडावर पोहोचल्यावर अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन इतिहासाला उजाळा देण्यात आला.
पाऊस, धुके आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अनुभव घेत, उपस्थितांनी गरमागरम भजी आणि मिसळ-पावचा आस्वाद घेतला. या भेटीमुळे भविष्यातही अशाच ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळांना भेट देण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
या सिंहगड ट्रेकसाठी संदीप चौधरी, नितीन कांबळे, गौतम तायडे, अरुण इंगळे, किरण सैदाणे, मधुकर दुपारगुडे, सुरेश समदडे, धम्मपाल बनसोडे (त्यांचे चिरंजीव संकल्प बनसोडे यांच्यासह), विराज लोंढे, विनोद निगडे, यशोदीप शरणागत आणि राजेश कोसोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सक्षम ताटे हत्या प्रकरण: पोलीस कारवाईच्या मागणीसाठी आचल ताटे अन् मातेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
नांदेड : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या सक्षम ताटे खून प्रकरणातील संताप आता रस्त्यावर आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या अटकेनंतर...
Read moreDetails






