Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

mosami kewat by mosami kewat
March 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
       
मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी आंदोलन छेडले.

बुद्ध विहारावर सुरू असलेल्या या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाला जाब विचारला. परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचे पाहता पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान वंचित बहुजन आघाडी मुंबई युवा अध्यक्ष सागर गवई, महिला अध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा महासचिव विपुल हिरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बुद्ध विहारावरील तोडक कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, या घटनेमुळे जय भीम नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनीही बुद्ध विहारावरील कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने या प्रकरणात संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags: bmcBuddh viharbuddhismBuddhistMaharashtramumbaipoliceprotestVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next Post

नालासोपाऱ्यात ‘दावत-ए-इफ्तार’ उत्साहात; वंचित बहुजन आघाडी व स्वराज्य प्रतिष्ठानचा सामाजिक सलोख्याचा पुढाकार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home