Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
March 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
       
कर्जत (अ. नगर) : घरगुती गॅस सिलेंडर तुटवडा आणि वाढती महागाई याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. १६ मार्च) रोजी सकाळी ११ वाजता कर्जत तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. (Vanchit Bahujan Aghadi Protest)

यावेळी बोलताना ॲड. अरुण जाधव यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेल्या जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडून या प्रकरणाच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व घडामोडींमुळे देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पंतप्रधानांनी या संदर्भात देशासमोर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

याचबरोबर देशात वाढलेली महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा याविरोधात केंद्र सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली. (Vanchit Bahujan Aghadi Protest)

या आंदोलनात युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, आप्पा सरोदे, तुकाराम पवार, गोदड समुद्र यांचीही भाषणे झाली. यावेळी युवा आघाडी तालुका अध्यक्ष दत्ता भालेराव, जिल्हा महासचिव संजय शेलार, जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, ज्येष्ठ सल्लागार दिलीप हिरभगत, कर्जत शहराध्यक्ष विकास समुद्र, प्रदीप समुद्र, मनोज हिरभगत, रवि सोनवणे, हरीन पोटरे, भाऊ पोटरे, रंगीशा काळे, नुरा भोसले, काजोरी पवार, जुकी भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व भीमसैनिक उपस्थित होते. आंदोलनाचे नियोजन व आयोजन तालुकाध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केले. तर आंदोलनाची सविस्तर माहिती कर्जत शहराध्यक्ष विकास समुद्र यांनी दिली.

Tags: Arun JadhavkarjatKarjat newsMaharashtraPoliticalpoliticsVanchit Bahujan Aghadi Protest
Previous Post

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

Next Post

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home