Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

mosami kewat by mosami kewat
March 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या शहर व जिल्हा सोलापूर (Solapur) युनिटच्या वतीने देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित मुद्द्यांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसाठी सोमवार (दि. १६ मार्च २०२६) रोजी निदर्शने करण्यात आली.

अलीकडील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या परराष्ट्र संबंधांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा करत, जागतिक स्तरावर चर्चेत असलेल्या जेफ्री एपस्टीन फाईल (Jeffrey Epstein) प्रकरणाशी संबंधित चर्चांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. (Solapur Protest)

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये पंतप्रधान आणि एपस्टीन यांच्यात कोणते संबंध किंवा व्यवहार होते का, इस्रायल दौऱ्यादरम्यान एपस्टीनकडून कोणताही सल्ला घेण्यात आला होता का, तसेच अमेरिकेसोबत झालेल्या आर्थिक करारांमध्ये पंतप्रधानांचा हस्तक्षेप होता का, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

तसेच अमेरिकेच्या दबावामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये अशी भूमिका घेतली जात आहे का, भारताच्या परराष्ट्र धोरणावर अमेरिकेचा प्रभाव आहे का आणि देशाचे आर्थिक व ऊर्जा धोरण स्वतंत्र आहे का, याबाबत केंद्र सरकारने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. (Solapur Protest)

हे प्रश्न कोणत्याही पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून देशाच्या सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक स्वायत्ततेशी निगडित असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा विचार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (Solapur Protest)

या आंदोलनात आतिश बनसोडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मजिखांबे, महेश जाधव, संजय हरिजन, राहुल शिंदे, गौतम थापटे, विक्रांत गायकवाड, विनोद इंगळे, सुरेश गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: ForeignPolicyDebateindiandemocracyIndiaNewsIndiaPoliticsJeffreyEpsteinMaharashtraNewsNarendraModiNationalSecurityIndiaPoliticalAccountabilityPoliticalProtestsolapurSolapurProtestvanchitbahujanaghadiVBAProtest
Previous Post

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

Next Post
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home