Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!

mosami kewat by mosami kewat
August 12, 2025
in बातमी
0
मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!

मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!

       

सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले असून, हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. नागरिकांचे स्थलांतर अर्धवट अवस्थेत थांबले आहे, मूलभूत सुविधा नाहीत आणि विकासाचे आश्वासन केवळ कागदावरच आहे. वारंवार एसआरए व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊनही, सरकार व प्रशासन कानावर हात ठेवून बसले आहे. ही बेफिकिरी आणि दुर्लक्ष आता नागरिकांना मान्य नाही.

या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) कार्यालय वांद्रे, मुंबई येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा केवळ निवेदनापुरता मर्यादित नसून, रखडलेले प्रकल्प मार्गी लागेपर्यंत लढा सुरू राहील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.

या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी करणार आहेत. नुकतीच एसआरए पीडित कुटुंबियांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. 35 पेक्षा जास्त एसआरए प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रकल्पग्रस्तांचे वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने उचलले जाणार आहेत.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन या प्रकरणी मदत करण्याची विनंती वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींना केली होती. आजतागायत कुठल्याही राजकीय पक्षाने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा दिला नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. हा लढा फक्त वंचित बहुजन आघाडी लढू शकते, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

आंदोलनाच्या मुख्य मागण्या –

– रखडलेले सर्व एस.आर.ए. प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत.

– भाडे थकबाकीची तात्काळ भरपाई करण्यात यावी

– गैरवर्तन करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी.

– झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन वेळेत आणि योग्य ठिकाणी करावे.

– एस.आर.ए. प्राधिकरणाने प्रकल्पांची प्रगती सुस्पष्टपणे जाहीर करावी.

– बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीला आळा घालावा.

– गरज असल्यास शासनाने प्रकल्प ताब्यात घेऊन स्वतः कार्यवाही करावी, यासह अनेक वेगवेगळ्या मागण्या आहेत.

एसआरए पीडित नागरिक हे सर्व गरीब, शोषित, पीडित, वंचित बहुजन समाजातील असून जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जातोय. या सर्व पीडितांनी आपला विश्वास फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीवर व्यक्त केलाय.


       
Tags: mumbaiprotestvbaforindia
Previous Post

‎’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

Next Post

दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

Next Post
दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!
बातमी

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

by mosami kewat
November 19, 2025
0

बीड : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन पूर्ण ताकतीने लढत आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

November 19, 2025
उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

उरण-मुंबई बेस्ट बससेवेला सुरूवात; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

November 19, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने निवडून द्या : सुजात आंबेडकर

November 19, 2025
अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपीला त्वरित फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

November 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home