बीड : विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने आज, १२ सप्टेंबर २०२५ रोजी गेवराई तालुक्यात भव्य जन आक्रोश महामोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, मुख्यतः महिला आणि तरुणाई सहभागी झाली होती.
या मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुकाध्यक्ष अजय उर्फ पप्पू गायकवाड आणि महासचिव किशोर भोले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले होते. यावेळी प्रशासनाच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या मोर्च्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा बीड जिल्ह्याचे प्रभारी प्रा. किसन चव्हाण उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यासोबतच, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विष्णू जाधव, जिल्हाध्यक्ष अजय सरोदे, महासचिव खंडू जाधव, आणि मल्हार सेनेचे विष्णू देवकाते यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारीही या मोर्चात सहभागी झाले होते.