औरंगाबाद : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना योगेश बन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या अभिवादन कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, पी. के. दाभाडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, युवा शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, पश्चिम शहर उपाध्यक्ष शाहीर मेघानंद जाधव, करूणा जाधव, अजय मगरे, एस. पी. मगरे, रवी रत्नपारखे आदी उपस्थित होते.
भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी...
Read moreDetails






