मुंबई : वंचित बहुजन आघाडी ( VBA) च्यावतीने मुंबई येथील सायन कोळीवाडा, प्रभाग क्रमांक १७६ येथील त्रिरत्न बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्र. १७६ चे समन्वयक प्रतीक मोहन कांबळे यांच्यावतीने धम्मबांधवांना अल्पोपहार वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान, त्रिरत्न बुद्ध विहाराचे कार्यकर्ते अॅडव्होकेट मोतीराम जाधव यांनी समन्वयक प्रतीक मोहन कांबळे यांचा सत्कार केला. तसेच, भारतीय बौद्ध महासभा, झोन क्र. २ चे उपाध्यक्ष रमेश वाघचौरे यांचा सत्कार जगताप साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतीक मोहन कांबळे यांनी या प्रसंगी धम्म बांधवांना वर्षावासाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि पक्षाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला त्रिरत्न बुद्ध विहाराचे पदाधिकारी भगवान तूपलोंढे आणि जगताप साहेब उपस्थित होते. याशिवाय, विशाखा धम्म जागृती समितीच्या काळे ताई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समितीच्या वस्तला हिरे ताई यांचीही उपस्थिती होती.
भारतीय बौद्ध महासभा, झोन २ चे उपाध्यक्ष, बौद्धचार्य आणि माजी श्रामनेर रमेश वाघमारे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. वंचित बहुजन आघाडीचे सायन कोळीवाड्याचे माजी तालुका अध्यक्ष अशोक इंगळे, माजी महासचिव दिनेश कांबळे, आणि माजी महिला तालुका अध्यक्षा आरती कांबळे हे देखील उपस्थित होते. प्रभाग क्र. १७६ चे कार्यकर्ते संकेत कांबळे, युवा वॉर्ड महासचिव दीपक कांबळे, आणि बाजीराव झणकर यांच्यासह अनेक स्थानिक धम्मबांधवांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...
Read moreDetails