अकोला : आगामी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज सकाळी ११ वाजता अकोला येथील यशवंत भवन येथे पार पडली. या बैठकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला तसेच संभाव्य युती, आघाड्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत येणाऱ्या काळात विविध नगर परिषद आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये पदाधिकारी बैठका घेऊन निवडणुकीसंबंधी इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषदेतील कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फसणार – राजेंद्र पातोडे यांचा इशारा
या बैठकीला केंद्रीय पदाधिकारी माजी आमदार अॅड. नातिकोद्दीन खतीब, अरुंधती सिरसाठ, राज्य पदाधिकारी राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, भारिप बहुजन जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे आणि गटनेता ज्ञानेश्वर सुलताने प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत पक्ष संघटन मजबुती, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क मोहीम आणि उमेदवार निवड प्रक्रियेला गती देण्यावर भर देण्यात आला. आगामी निवडणुका लढविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.





