Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा : पीडित दलित शेतकऱ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट!

mosami kewat by mosami kewat
November 8, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा : पीडित दलित शेतकऱ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट!

पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा : पीडित दलित शेतकऱ्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट!

पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरातील ४३ एकर महार वतनाची १८०० कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे केवळ ३०० कोटी रुपयांना विकण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.

या पीडित दलित शेतकऱ्यांनी आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली. या प्रकरणी पीडित दलित शेतकऱ्यांनी आमची फसवणूक करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

ही जमीन पूर्वी सरकारने भाडेपट्ट्यावर दिली होती. तथापि, योग्य सरकारी मान्यता न घेता आणि सरकारी संगनमताने, हा करार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ९९% हिस्सा असलेल्या कंपनीला करण्यात आला. शिवाय, या करारावर २१ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, “हे भ्रष्टाचार आणि अन्यायाचे उदाहरण आहे. ‘मी खाणार नाही आणि दुसऱ्यांना खाऊ देणार नाही’ असे म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करावे – हे तुमचे भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे का? ‘सबका साथ, सबका विकास’चे हे वास्तव आहे का?”

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले आहे की, ते पीडित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि महार वतन जमिनी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढतील.

जिल्हा परिषदेतील कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फसणार – राजेंद्र पातोडे यांचा इशारा

कालच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात निदर्शने केली. पीडित शेतकऱ्यांना घेऊन पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

Tags: AgriculturalFarmerMaharashtraPoliticalPrakash AmbedkarPrakash AmbelpuneVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Akola : नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

Next Post

‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे ‘आयुष्यभर विद्यार्थी’ राहण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक संकल्प!

Next Post
‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे ‘आयुष्यभर विद्यार्थी’ राहण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक संकल्प!

'सिम्बॉल ऑफ नॉलेज' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे 'आयुष्यभर विद्यार्थी' राहण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक संकल्प!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home