Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

जिल्हा परिषदेतील कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फासणार – राजेंद्र पातोडे यांचा इशारा

mosami kewat by mosami kewat
November 8, 2025
in Uncategorized, बातमी
0
जिल्हा परिषदेतील कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फसणार - राजेंद्र पातोडे यांचा इशारा

जिल्हा परिषदेतील कमिशनखोरी बंद न केल्यास कार्यकारी अभियंत्यास काळे फसणार - राजेंद्र पातोडे यांचा इशारा

       

अकोला : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कमिशनखोरी आणि भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने आज थेट आक्रमक पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना निर्वाणीचा इशारा देत म्हटले की – “जिल्हा परिषदेच्या कामांमधील कमिशनखोरी आणि ठराविक कंत्राटदारांना प्राधान्य देणे हे त्वरित थांबवावे, अन्यथा कार्यकारी अभियंत्यास काळे फासून आंदोलन केले जाईल.”

 भ्रष्टाचारावर पोलखोल –

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत कामवाटपातील भ्रष्टाचाराची संपूर्ण पोलखोल करण्यात आली.

राजेंद्र पातोडे यांनी सांगितले की, ४ नोव्हेंबर रोजी संविधान भवन येथे झालेल्या कामवाटप समितीच्या सभेत २२ कामांची किंमत फक्त ३३ लाख रुपये दाखवली गेली, परंतु प्रत्यक्षात ती कामे सुमारे ७ कोटी ७० लाख रुपयांच्या असल्याचे उघड झाले आहे. ही कामे छुप्या आणि बेकायदेशीर पद्धतीने ठराविक कंत्राटदारांना फायद्याचे होईल अशा रीतीने वाटप करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

पार्थ पवार आणि ‘अमेडिया ३ एलएलपी’च्या भागीदारांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करा : जमिनीच्या मालकांची पोलिसात तक्रार

आमदाराचे नाव घेऊन टेंडरमध्ये अडथळे

अकोट तालुक्यातील रामपूर (धारूळ), अकोलीजहान, तसेच तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार, भिली, अडगाव बु. या ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या विकास कामांसाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दिले असूनही, कर्मचारी आणि अभियंते टेंडर बुक देण्यास टाळाटाळ करत आहेत. अगदी काही ठिकाणी आमदारांचे नाव सांगूनही प्रस्ताव रोखले जात आहेत, असा आरोप पातोडे यांनी केला. त्याच गावातील एका कामाचे टेंडर बुक एका ठेकेदाराला दिले गेले, तर दुसऱ्या कामासाठी सरपंचाला मुद्दाम अडवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इशारा –

या सर्व प्रकाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तक्रार करण्यात आली असून, जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर वंचित बहुजन युवा आघाडी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पातोडे यांनी दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भ्रष्टाचार थांबला नाही, तर कार्यकारी अभियंता यांना काळे फासून निषेध केला जाईल.”

या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, माजी जि.प. सदस्य गोपाल कोल्हे, सचिन शिराळे, जय रामा तायडे, नागेश उमाळे, वैभव खडसे, सुगत डोंगरे, श्रीकृष्ण देवकुणबी, राजदर खान, अमोल डोंगरे, महेंद्र शिरसाट, अमोल वानखडे, अभी वानखडे, मयूर सपकाळ, रवी वानखडे, आकाश शेगोकार, विश्वजीत खंडारे, विजय पातोडे, विकी दांदळे, आकाश जंजाळ, सुरज दामोदर, आकाश गवई, रवि वानखडे यांसह वंचित बहुजन युवा आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: AkolaCorruptionMaharashtrapolicepoliticsVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

पार्थ पवार आणि ‘अमेडिया ३ एलएलपी’च्या भागीदारांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करा : जमिनीच्या मालकांची पोलिसात तक्रार

Next Post

Akola : नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

Next Post
नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

Akola : नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!
बातमी

अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल म्हणजे राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक!

by mosami kewat
November 12, 2026
0

राजेंद्र पातोडे यांची टीका; बदर समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी मुंबई : महाराष्ट्रातील ५९ अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी...

Read moreDetails
आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

आयडीबीआयचे पैसे वापरून आयडिबीआयची खरेदी? “लिव्हरेज बाय आऊट” (LBO) सारखा भारतातील कॅनेडियन प्रयोग ! 

November 12, 2026
दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

दरवर्षी येणारे सणासुदीचे दिवस तेच आहेत; पण श्रमिकांना दिवाळीत मिळणारा चा “बोनस” संपला; भांडवलाला मिळू लागला! 

November 10, 2026
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

November 8, 2026
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

November 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home