लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या आगामी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या नियोजनासाठी लातूर येथे एक विशेष बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार आयोजित या बैठकीत लवकरच होणाऱ्या शिबिरात संघटनात्मक बांधणी, निवडणूक रणनीती आणि वंचित समाजाच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
भालचंद्र ब्लड बँक येथे आयोजित या बैठकीला नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राज्य नेते अविनाश भोसीकर, युवक कार्यकारी सदस्य अमोल लांडगे, जिल्हा निरीक्षक सिद्धोधन सावंत, जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, महिला जिल्हाध्यक्षा मंजू निंबाळकर यांच्यासह ॲड. रोहित सोमवंशी, सचिन गायकवाड, सुजाता आजनिकर, विनोद खटके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी ही संविधानवादी, आंबेडकरवादी आणि पुरोगामी विचारसरणीवर आधारित असून, सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.
राज्यात पुढील ५ दिवस ‘धुवॉंधार’ पाऊस! २१ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील...
Read moreDetails