लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या आगामी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या नियोजनासाठी लातूर येथे एक विशेष बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार आयोजित या बैठकीत लवकरच होणाऱ्या शिबिरात संघटनात्मक बांधणी, निवडणूक रणनीती आणि वंचित समाजाच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
भालचंद्र ब्लड बँक येथे आयोजित या बैठकीला नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राज्य नेते अविनाश भोसीकर, युवक कार्यकारी सदस्य अमोल लांडगे, जिल्हा निरीक्षक सिद्धोधन सावंत, जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, महिला जिल्हाध्यक्षा मंजू निंबाळकर यांच्यासह ॲड. रोहित सोमवंशी, सचिन गायकवाड, सुजाता आजनिकर, विनोद खटके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी ही संविधानवादी, आंबेडकरवादी आणि पुरोगामी विचारसरणीवर आधारित असून, सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत PMOची दखल! मुंबई : फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत सोशल मीडियावरील एका पोस्टची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत केंद्रीय विद्यापीठांकडून माहिती...
Read moreDetails






