Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोठारी येथे सांची बुद्ध विहारात वर्षावास निमित्त प्रवचन कार्यक्रम संपन्न

mosami kewat by mosami kewat
September 3, 2025
in बातमी
0
कोठारी येथे सांची बुद्ध विहारात वर्षावास निमित्त प्रवचन कार्यक्रम संपन्न

कोठारी येथे सांची बुद्ध विहारात वर्षावास निमित्त प्रवचन कार्यक्रम संपन्न

नांदेड : भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा किनवट यांच्या वतीने कोठारी येथील सांची बुद्ध विहारात वर्षावास निमित्त प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करण्यात आले.
‎
‎यावेळी केंद्रीय शिक्षक व बौद्धाचार्य इंजि. एम. एम. भरणे (परभणी) यांनी ‘सिद्धार्थाचा गृहत्याग व ज्ञानप्राप्ती’ या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन दिले. त्यांनी सांगितले की, दु:खापासून मुक्ती मिळवण्यासाठी सिद्धार्थ यांनी राजवैभवाचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली, मात्र त्यांना यश आले नाही. अखेरीस दृढ निश्चय आणि अधिष्ठानामुळे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी सारनाथ येथे प्रथम धम्माची शिकवण दिली.
‎
‎भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या संकल्पनेतून ही प्रवचन मालिका आयोजित करण्यात आली असून, इंजि. भरणे यांचे विविध शहरांमध्ये प्रवचन सुरू आहेत.
‎
या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे, तालुका संस्कार उपाध्यक्ष बौद्धाचार्य अनिल उमरे, तालुका संघटक भगवान मुनेश्वर, आयु. सांची कानिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बौ. अनिल उमरे यांनी वंदना घेऊन केली, तर आयु. निकिता कांबळे यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन केले.
‎
‎ग्राम शाखा अध्यक्ष सुधाकर हलवले, विजय पाटील व विजेंद्र कांबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बौ. महेंद्र नरवाडे यांनी प्रास्ताविक केले, तर बौ. भगवान मुनेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा समारोप सरनतय गाथेने झाला. याप्रसंगी कोठारी येथील पदाधिकारी, उपासक-उपासिका आणि रमाई महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: nandedSanchi Buddha Vihar
Previous Post

काँग्रेस, बसप, बीआरएसपी कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

Next Post

लातुरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

Next Post
लातुरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

लातुरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home