Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती 

mosami kewat by mosami kewat
March 13, 2026
in बातमी, सामाजिक
0
परभणी: १० दिवसांचे श्रामनेर आणि बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी; भन्ते पी. धम्मानंदजी यांची उपस्थिती 
       

10 दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप

परभणी : भारतीय बौद्ध महासभा, परभणी जिल्हा दक्षिण तसेच पूर्णा तालुका व शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णा शहरात दिनांक १ मार्च ते १० मार्च दरम्यान दहा दिवसीय श्रामनेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १० मार्च रोजी या शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला पूज्य भन्ते पी. धम्मानंदजी (भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ, चैत्यभूमी स्मारक सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच केंद्रीय शिक्षक व प्रशिक्षक आदरणीय दशरथ गायकवाड सर कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन व प्रचार सचिव बाबासाहेब धबाले, परभणी जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष व केंद्रीय शिक्षक तुकाराम ढगे सर, परभणी जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष एम. एम. भरणे, दक्षिण जिल्ह्याचे सरचिटणीस गौतमराव दिपके, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष यशवंतराव लामसोंगे, जिल्हा संघटक ॲड. सिद्धार्थ खरे, पंजाबराव मनोहर, तालुका कोषाध्यक्ष राहुल कचरे, शहर शाखेचे अध्यक्ष बौद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे, तालुका संरक्षण केशव मकासरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय धारबा धुमाळे, राजू गायकवाड, राहुल शिवभक्त, गोविंदराव गायकवाड, दिलीप हनवते, भगवान जोंधळे, मनोज मुळे, अशोक खरे, क्रांतिकार ढगे, प्रेमानंद ढगे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार सुनील मगरे, प्राचार्य केशव जोंधळे सर, माजी नगरसेवक नटराज कांबळे, अनिल इंगोले, सुदाम गायकवाड, कणकटे मामा, आनंद गायकवाड, राहुल गायकवाड, मधुकर खंदारे, आश्रोबा श्रीखंडे, मगरे मामा तसेच मोठ्या संख्येने बुद्ध उपासक-उपासिका व बालक-बालिका उपस्थित होते.

यावेळी पूज्य भंते पी. धम्मानंदजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी भारतीय बौद्ध महासभेच्या विचारधारेशी प्रामाणिकपणे कार्य केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समतामूलक समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

कार्यक्रमात अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, तसेच प्रमुख पाहुणे एम. एम. भरणे, तुकाराम ढगे, बाबासाहेब धबाले आणि प्राचार्य केशवराव जोंधळे सर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष बौद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल कचरे यांनी मानले. शेवटी सरनत्य गात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा दक्षिण, तालुका व शहर शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाच्या सैनिकांनी मोठ्या परिश्रमाने योगदान दिले.


       
Tags: Bhartiya baudh maha sabhabuddhismBuddhistparbhaniParbhani newsvbaforindia
Previous Post

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

Next Post

पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

Next Post
पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

पुणे: गॅस तुटवड्यामुळे खाद्यान्न साखळी विस्कळीत; ऑनलाइन फूड ऑर्डर्स स्वीकारणे तात्पुरते बंद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 
बातमी

गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

by mosami kewat
August 22, 2026
0

जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता...

Read moreDetails
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी

August 22, 2026
मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

मनमाडमध्ये सार्वजनिक जागेवर खाजगी टर्फ उभारण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; उद्घाटनास विरोध करण्याचा इशारा

August 22, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयांवर कारवाई करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

August 22, 2026
अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!

August 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home