अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) तेल्हारा तालुक्यातील अडगाव सर्कलची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताने निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, तालुकाध्यक्ष अशोक दारोकार, गोपाल कोल्हे, मधुभाऊ बरिंगे, माजी पंचायत समिती सदस्य इद्रीस भाई, माजी जिल्हा परिषद सदस्य कुमुदिनी कोल्हे, माजी सभापती काळपांडे, बाबूजी खोब्रागडे, रतन दांडगे, संजय किर्तक, प्रियंका खिरोडकर, आणि डॉ. राजुस्कर यांचा समावेश होता.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्षाला यश मिळवून देण्याचे आवाहन केले. सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी गावागावांत जाऊन प्रचार करण्याची रणनीतीही या बैठकीत ठरवण्यात आली.