मुंबई : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून, या यादीत 10 उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवल्याची माहिती पक्षाच्या अधिकृत हॅंडलवरुन दिली आहे. यामध्ये रायगडमधून कुमुदिनी चव्हाण, उस्मानाबादमधून भाऊसाहेब आंधळकर, नंदुरबारमधून हनुमंतकुमार सूर्यवंशी, जळगावमधून प्रफुल्लकुमार लोढा, दिंडोरीमधून गुलाब बर्डे, पालघरमधून विजया म्हात्रे, भिवंडीमधून नीलेश सांबरे, मुंबई उत्तर मध्यमधून बिना सिंग, मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी आणि मुंबई दक्षिण मध्यमधून अबुल हसन खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तिसऱ्या यादीत अबुल हसन खान यांना मुंबई उत्तर मध्यमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने मुंबई दक्षिण मध्यमधून अबुल हसन खान यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता मुंबई उत्तर मध्यमधून बिना सिंग निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.