Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 13, 2025
in बातमी
0
संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील इंदिरा नगर येथील पल्लवी सागर गंगावणे यांच्यावर झालेल्या विनयभंग, मारहाण, चोरी आणि बदनामीच्या प्रकरणात संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, अहिल्यानगर ने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन केली आहे.
‎
‎निवेदनात , संगमनेर तालुक्यातील तलाठी मच्छिंद्र राहाणे यांनी पल्लवी गंगावणे यांचा रात्री उशिरा वारंवार फोन करून, घराचे दार ठोठावून आणि अश्लील संदेश पाठवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पल्लवी यांनी हा प्रकार तलाठ्याच्या पत्नीला सांगितल्यानंतर, सूडबुद्धीने राहाणे यांनी आकाश उर्फ पप्पू गोडगे आणि त्याच्या साथीदार दहा महिलांच्या मदतीने पल्लवी यांच्या घरावर हल्ला केला.
‎
‎या हल्ल्यात पल्लवी आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांच्यावर जातीय अपमानकारक शिवीगाळ करत, त्यांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे गंठण हिसकावून नेण्यात आले. या घटनेनंतर तलाठी राहाणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पल्लवी यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले. एवढेच नाही, तर सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट प्रसारित करून त्यांचा मानसिक छळ केला. आरोपी जामिनावर असतानाही पल्लवी यांच्या घरातील वस्तूंची चोरी केल्याची तक्रारही निवेदनात नमूद आहे.
‎
‎या प्रकरणात आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भादंवि कलम ३५४, ३५४(अ), ३९२, ३८०, ५०६, ५०९, ५००, ३४ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष योगेश साठे, युवा शहर अध्यक्ष ॲड. योगेश गुंजाळ, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: crimepolicevbaforindiaअहिल्यानगर
Previous Post

आदिवासी तरुण जगदीश ठाकरे हत्या: चाळीसगावात वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा ‘जबाब दो’ मोर्चा

Next Post

Election commission : निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र; पण अद्याप उत्तर नाही!

Next Post
Election commission :  निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र; पण अद्याप उत्तर नाही!

Election commission : निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र; पण अद्याप उत्तर नाही!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर
बातमी

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
August 24, 2026
0

पुणे : पुण्यात 22 ऑगस्ट रोजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता, यामध्ये मनुस्मृतीचा दाखला देत...

Read moreDetails
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 24, 2026
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

August 24, 2026
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026
Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home