Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पलूस तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबीत करण्याची ‘वंचित’ ची मागणी.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 10, 2024
in बातमी
0
पलूस तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबीत करण्याची ‘वंचित’ ची मागणी.
       

सांगली : पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या कृषी राज्य मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्याच मतदारसंघातील पलूस तालुक्यातील कृषी विभागातील औषध फवारणी यंत्र अनुदान प्रकरणी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

पलूस तालुक्यातील औषध फवारणी यंत्र प्रकरणात अनेकांनी यंत्र खरेदी न करता शासनाचे अनुदान घेतले असून यातील औषधयंत्र विक्रेत्याला परवानगी नसताना बोगस प्रमाणपत्र तयार करून यंत्र विक्री केली असलेचे निदर्शनास येत आहे तसेच काही शेतकऱ्यांना दिलेले फवारणी यंत्र हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.

सदर प्रकरणी 4 महिन्यापासून चौकशी व कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करत असून चौकशी समितीने विश्वासात न घेता चुकीचे पद्धतीने तपास केल्याने या कार्यालयाचा निषेध व्यक्त करत पुढील 15 दिवसात पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे तसेच बोगस अनुदान लाटणारे व बोगस औषध फवारणी यंत्र विक्रेत्यावर फौजदारी गुन्हे दाखल न झालेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष गायगवाळे यांनी दिला.

यावेळी वंचित कामगार संघटनेचे नेते संजय कांबळे, अक्षय बनसोडे, स्वप्नील खांडेकर, विशाल धेंडे, जगदीश कांबळे, परशुराम कांबळे, शाकिब पटेल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: MaharashtrasangaliVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सावित्रीमाई फुलेंची जयंती साजरी.

Next Post

धुळ्यात स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने मनुस्मृती दहन !

Next Post
धुळ्यात स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने मनुस्मृती दहन !

धुळ्यात स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने मनुस्मृती दहन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष
बातमी

वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष

by mosami kewat
January 18, 2026
0

नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद नागपूर जिल्ह्यात उमटत आहेत. सध्या जल्लोषाचे वातावरण...

Read moreDetails
चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

January 18, 2026
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

January 17, 2026
काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

January 17, 2026
प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

प्रभाग क्रमांक ३ मध्ये ‘गुलाल’ उधळला! पॅनेलचा दणदणीत विजय

January 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home