अकोला – शहरात १५ नोव्हेंबरला एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिच्या शरीराची विटंबना केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. घटना घडून दोन दिवस उलटले तरी पीडित असलेले कुटुंब गुंड प्रवृत्तीच्या आरोपीच्या दहशतीला घाबरून तक्रार देण्यास घाबरत होते. सदर घटनेची माहिती १७ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांना मिळताच त्यांनी यावर ऍक्शन घेत पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री ३ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून गुन्हा दाखल होऊन आरोपीच्या अटकेपर्यंत त्यांनी ठिय्या दिला.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेत्या अरुंधतीताई शिरसाठ, प्रभाताई शिरसाट, पुष्पाताई इंगळे, वंदनाताई वासनिक, आम्रपालीताई खंडारे, सचिन शिराळे, गजानन दांडगे, गणेश सपकाळ, आशिष मांगूळकर, सुनंदाताई चांदणे हे पदाधिकारी हजर होते.
आरोपीने अल्पवयीन मुलीचे केस कापले व सलूनमध्ये नेऊन तिचे टक्कल केले, सिगारेटचे चटके दिले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे अकोल्यातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी आक्रमक होतं पीडित मातंग कुटुंबियांच्या बाजूने उभे राहत आरोपीला अटक केली.
अश्या मस्तावलेल्या गुंड प्रवृत्तीपासून अकोलामध्ये महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडतो.
सत्तेत मस्तावलेले राजकारण्यांमुळे महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न अकोल्यात निर्माण झालाय. कुठेही अन्याय-अत्याचार झाला, तर पीडितांच्या बाजूने शेवटपर्यंत लढा लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ठाम उभी आहे.