Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

mosami kewat by mosami kewat
September 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा
       

आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

अमरावती : तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागातील मूलभूत नागरी सुविधा आणि अनुसूचित जाती वस्त्यांमधील प्रलंबित समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण होत असून, अनुसूचित जाती वस्त्यांमधील अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

दापोरी येथील बंद असलेला आरओ प्लांट तातडीने सुरू करण्यासाठी त्याची चौकशी करून नागरिकांच्या सोयीसाठी तो कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती वस्त्यांमधील रस्त्यांवर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वरूडा येथील अनुसूचित जाती वस्तीत उभारण्यात आलेला पूल अवघ्या एका वर्षात खचून पडल्याचा आरोप करत या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय पावसाळ्यात साथीचे आजार आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात नियमित धूरफवारणी करण्यात यावी, यासह इतर विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांची आठ दिवसांत पूर्तता करावी, अन्यथा गावकऱ्यांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.

निवेदन सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते, तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, प्रमोद मुंद्रे, उपाध्यक्ष नितीन थोरात, सिद्धार्थ कटारने, भुजंग वावरे, अनिल गाडगे, श्रीकृष्ण वावरे, सचिन बाखडे, अभिषेक मनोहरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: amravatiMaharashtraPoliticalTivsaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी

Next Post

COEP च्या ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या पाठपुराव्याला यश; ५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या प्रवेशाची परवानगी

Next Post
COEP च्या ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या पाठपुराव्याला यश; ५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या प्रवेशाची परवानगी

COEP च्या 'सम्यक विद्यार्थी आंदोलना'च्या पाठपुराव्याला यश; ५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या प्रवेशाची परवानगी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home