Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
September 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी
       

लंडन : अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून, लंडनमधील त्यांच्या प्रस्तावित कार्यक्रमाला विविध संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. लंडनमधील १५ संघटना आणि काही व्यक्तींनी महापौर सादिक खान यांना पत्र लिहून RSSच्या कार्यक्रमांसाठी ग्रेटर लंडन अथॉरिटीची कोणतीही जागा उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणी केली आहे.

मोहन भागवत यांच्या लंडन दौऱ्यापूर्वीच RSS विरोधात निदर्शने आणि निषेध सुरू झाले आहेत. संबंधित संघटनांनी आपल्या पत्रात RSSवर गंभीर आरोप करत या संघटनेचे स्वरूप “हुकूमशाही, लष्करी गट” तसेच “फॅसिस्ट” असल्याचे म्हटले आहे. तसेच, महापौर कार्यालयातील कोणताही प्रतिनिधी RSSशी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाही, याची पुष्टी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

‘द्वेषाला स्थान नसावे’; जेरेमी कॉर्बिन यांचा विरोध

ब्रिटिश खासदार जेरेमी कॉर्बिन यांनीही मोहन भागवतच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर RSSवर टीका केली आहे. उजव्या विचारसरणीच्या हिंसेचा गंभीर इतिहास असलेल्या संघटनेच्या नेत्याला ब्रिटनने आश्रय देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. लंडनसारख्या शहरात अशा प्रकारच्या द्वेषाला स्थान नसावे, अशी भूमिकाही कॉर्बिन यांनी व्यक्त केली.

महापौर सादिक खान यांना पत्र लिहिणाऱ्या संघटनांमध्ये Hindus for Human Rights, UK-Indian Muslim Council, India Labour Solidarity आणि South Asia Solidarity Group यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही RSSविरोधात निदर्शने

यापूर्वी मोहन भागवतच्या अमेरिकेतील दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या कार्यक्रमालाही विविध संघटनांनी विरोध केला होता. आता ब्रिटनमध्येही RSSविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. भारतातही RSSवर बंदी घालण्याची मागणी विविध स्तरांतून होत असल्याचे या पार्श्वभूमीवर नमूद केले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी RSS ला मनुवादी संघटना संबोधत समाजात द्वेष पसरविण्याचे काम संघटनेकडून होत असल्याचा आरोप गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने करत आहेत. त्यामुळे RSSवर बंदी घालावी, अशी भूमिका त्यांनी यापूर्वी मांडली आहे.

मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या संघटनांनी २००२ मधील गुजरात दंगलीतील RSSच्या भूमिकेचाही संदर्भ दिला आहे. तत्कालीन ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या अहवालाचा हवाला देत RSSवर भेदभावाला प्रोत्साहन देणे आणि धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. RSSच्या कथित भूमिका आणि कृती ब्रिटनच्या मूल्यांशी विसंगत असल्याचा दावा या संघटनांनी पत्रातून केला आहे.

दरम्यान, मोहन भागवतच्या लंडन दौऱ्याला होणारा विरोध आणि महापौर सादिक खान यांना देण्यात आलेल्या निवेदनामुळे ब्रिटनमधील RSSच्या कार्यक्रमांवरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


       
Tags: americaMaharashtraMohan BhagwatmumbaiPrakash AmbedkarrssRSS Banलंडन
Previous Post

नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी

Next Post

ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Next Post
ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home