Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी

mosami kewat by mosami kewat
September 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नवी मुंबई: रबाळेतील साईबाबा नगरच्या समस्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी
       
नवी मुंबई : रबाळे येथील साईबाबा नगर परिसरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी घणसोली एफ वॉर्डचे सहायक आयुक्त संजीव तडवी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी साईबाबा नगर परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन विविध समस्यांची पाहणी केली.

परिसरातील खराब रस्ते, साचलेले सांडपाणी, अनियमित पाणीपुरवठा तसेच गटारांच्या कामांशी संबंधित समस्यांची सविस्तर पाहणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतले. आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पाहणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामे पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केली.

यावेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, युवराज सोनावणे, रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले, एम. डी. गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि विकासासाठी सातत्याने पाठपुरावा या भूमिकेतून नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडत राहणार, जोपर्यंत साईबाबा नगरमधील समस्यांचे पूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा पाठपुरावा आणि संघर्ष सुरूच राहणार असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags: Maharashtranew mumbaiPoliticalVanchit Bahujan Aghadiरबाळे साईबाबा नगर
Previous Post

गणेशोत्सव आणि पर्यावरणाची जपवणूक : अकोल्यात २० हजार चिमुकल्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती! 

Next Post

लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home