युवक, महिला, गरीब आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली !
मुंबई : देशात काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणूका होणार असून त्याआधीचा भारत सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. याचं पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, हे सरकार केवळ ज्ञान देत आहे पण, भारतीय युवा, गरिब आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वित्त मंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानली अशी टीकाही त्यांनी केली आहे.
जर अर्थव्यवस्था चांगली असेल, तर मागील 9 वर्षात 12 लाख 88 हजार 293 अती श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला ? ‘व्हायब्रंट गुजरात’ मधील 7 लाख 25 हजार लोकांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न का केला ? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
वास्तविक सरासरी उत्पन्न 50 % ने वाढल्याचा माहिती स्त्रोत काय आहे ? अशी विचारणा त्यांनी केली आहे. PM- Kisan साठी उद्धृत केलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती ही संशयास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.