ॲड. प्रकाश आंबेडकर : घटक पक्ष भाजपमध्ये जाणार नाही हे मतदारांना आश्र्वासित करा
अकोला : आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलो, तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यातच सामना होईल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्र्वासित करण्यासाठी आणि काही घटक पक्षांचा इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत, त्यांनी या धर्मनिरपेक्ष मतदाराला आम्ही भाजपसोबत यापुढे युती करणार नाही, असे आश्र्वासित करावे. आणि घटक पक्षांना शक्य असेल, तर याचा लेखी मसुदा युतीच्या वेळी जाहीर करण्याचे आवाहनही त्यांनी महाविकास आघाडीला केले आहे.
6 आणि 7 मार्च रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या मुंबई येथील बैठकीचे कोणतेही निमंत्रण नाही. पण शरद पवारांनी 6 तारखेला चर्चेसाठी बोलावले आहे.
आंबेडकर म्हणाले, बिहार किंवा उत्तर प्रदेशला प्रचाराला गेलो नाही, तरी तिथले 10 टक्के मतदान इथे बसून फिरवू शकतो. मला तिथे जाण्याची सुद्धा गरज नाही.