Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 19, 2024
in राजकीय
0
सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना हमीभाव देणार

वर्धा ः सरकारकडून सुरू असलेले दडपशाहीचे धोरण निवडणुका जवळ येतील, तसे आणखी वाढणार आहे. त्यामुळे काहीजण भाजपच्या गोटात जाणार आहेत. राजकीय नेत्यावर सुरु असलेल्या ईडी, सीबीआयचे छापेयापा-यांवरही पडणार आहेत. त्यामुळे व्यापा-यांनी सावध रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वर्धा येथे आयोजित महाएल्गार सभेत ते बोलत होते. या महाएल्गार सभेला मोठा जनसागर उसळला होता. त्यामुळे राज्यभर या सभेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या गोटात जाणा-यांबद्दल आंबेडकर म्हणाले की, तुम्ही खुशाल जा. लाज लज्जा अजिबात ठेवू नका. पण, कुटुंबाला तुरुंगात जाण्यापासून वाचवा, असा उपरोधिक टोलाही लगावला आहे.मोदी सरकारला आव्हान देताना आंबेडकर म्हणाले, मोदी म्हणत आहेत की, आमच्या 400 जागा निवडून येतील. पण, आजच्या परिस्थितीत 150 जागा निवडून आणून दाखवा. भारत सोडून गेलेल्या नागरिकांची माहिती देखील त्यांनी उघड केली. आंबेडकर म्हणाले, 24 लाख कुटुंबे भारताचे नागरिकत्व सोडून गेली आहेत. ज्यांची स्थावर मालमत्ता 100 कोटींच्या आसपास होती. यात मुस्लीम आणि ख्रिश्चन नाहीत. ते सगळे हिंदू आहेत आणि यांचाच प्रचार आहे की, हिंदूचे सरकार आले पाहिजे. मग हे लोक भारत सोडून का गेले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चौफेर फटकेबाजी करताना आंबेडकर म्हणाले की, सध्या धाडी घालण्यासाठी राजकीय नेत्यांचा नंबर लागला आहे. परत मोदी सत्तेत आले, तर तुमचा नंबर आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आता पैसे आणि मतदान करा त्यांना. पण तो जिंकून आला, तर ईडी तुमच्या बोकांडीवर बसल्याशिवाय राहणार नाही. यामुळे मतदान करण्याच्याआधी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

आंबेडकर म्हणाले की, या निवडणुकीत लोकशाहीसह संविधान वाचवलं पाहिजे. यासाठी मतदाराने लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी मी माझं मत भाजपविरोधी टाकणार असं गल्लोगल्ली, चौकाचौकात जाऊन सांगायला पाहिजे, अशी भावनिक सादही त्यांनी जनसमुदायाला घातली.

महाराष्ट्रातच नाहीतर देश पातळीवर सध्या शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मुद्द्याने सरकारला वेठीस धरले आहे. मात्र, आंबेडकर म्हणाले की, हमीभावाचा कायदा करा असे आमचे म्हणणे आहे. जेणेकरून या कायद्याचं उल्लंघन केले तर त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करता येईल. पण, हे सरकार लालाचं आहे. सामान्य माणसाचं नाही. यामुळे हे सरकार याकडे लक्ष देत नाही. मात्र, ज्या दिवशी सत्ता आपल्या हाती येईल, त्यादिवशी हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी नागरिकांना दिले आहे.


       
Tags: Mahaellagar sabhaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadiwardha
Previous Post

आम्हाला सत्ता द्या, आम्ही हमीभावाचा कायदा करतो – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

शिवजयंतीचे औचित्य साधून ‘वंचित’ ने केले माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन !

Next Post
शिवजयंतीचे औचित्य साधून ‘वंचित’ ने केले माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन !

शिवजयंतीचे औचित्य साधून 'वंचित' ने केले माँ जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवड: धावत्या 'ई-बस'ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली
बातमी

पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

by mosami kewat
October 10, 2025
0

पिंपरी-चिंचवड : प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून रस्त्यावर आलेल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बस आता प्रवाशांसाठीच धोकादायक ठरत आहेत की काय, असा प्रश्न पुन्हा...

Read moreDetails
भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे.

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

October 10, 2025
जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 10, 2025
फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

October 10, 2025
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची उद्या राज्यव्यापी महत्त्वपूर्ण बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार!

ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची उद्या राज्यव्यापी महत्त्वपूर्ण बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार!

October 9, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home