Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पांढरीतील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 12, 2024
in बातमी
0
पांढरीतील प्रवेशद्वाराचा वाद चिघळला
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांची घटनास्थळी भेट !

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील पांढरी येथील महापुरुषांच्या प्रवेशद्वाराचा वाद चिघळला आहे. प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 7 मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली.कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार झाल्याचीही माहिती आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की, “कमानीच्या संदर्भात गावात ठराव झाल्यानंतर अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर हे असं होतंय तर याच्यामागे राजकारण आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण आम्हाला त्या राजकाणाचा भाग व्हायचं नाहीये. गावात आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहायला हवी.”

आंबेडकर पुढे म्हणाले, “दोन्ही गटांमध्ये काही निर्णय न होता डीपीडीसीमध्ये तो व्हावा आणि ती कमान शासनच बांधेल असं व्हावं, असं मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललोय. कालच्या मोर्चात गावातले किती आणि बाहेरचे किती लोक होते, हाही अँगल तपासावा अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

“हे लोकसभा निवडणूक बघून काही जणांनी वातावरण बिघडावं अशा स्वरुपात केलेलं आहे का? ते नेमकं कुणी केलंय? ते मी शोधून काढायला सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण गढूळ व्हावं, यासाठी यात कुणाची भूमिका आहे का? हे तपासायला हवं.”


       
Tags: amravatiDr. Babasaheb AmbedkarPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

काँग्रेसने ‘मविआ’ कडे मागणी केलेल्याजागांवर चर्चेसाठी ‘वंचित’ ने दिला प्रस्ताव

Next Post

खोटे बोलत नसाल तर २४ तासांत १५ जागा घोषित करा

Next Post
खोटे बोलत नसाल तर २४ तासांत १५ जागा घोषित करा

खोटे बोलत नसाल तर २४ तासांत १५ जागा घोषित करा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला
बातमी

Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला

by mosami kewat
March 1, 2026
0

नांदेड : नांदेड दक्षिण तालुक्यातील तुप्पा येथे त्यागमाता रमाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात...

Read moreDetails
भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

March 1, 2026
CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू

CBSE चा मोठा निर्णय! इंग्रजीची सक्ती रद्द; २०२६-२७ पासून ‘त्रिभाषा सूत्र’ लागू

March 1, 2026
मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा ; उद्या मुंबईत महाआंदोलन

March 1, 2026
मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

मुद्रा मोदी ते मुजरा मोदी आंदोलन : पोलिसांकडून अडवणूक; नागरिकांचा पोलिसांना विरोध!

March 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home