]]>
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/vba-solapur-demands-atrocity-case-over-shetphal-buddhist-colony-attack/
Tue, 29 Sep 2026 07:18:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20417सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील बौद्ध वस्तीमध्ये झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी, दक्षिण सोलापूरच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामीण सोलापूरच्या उपपोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. शेटफळ येथील मागासवर्गीय बौद्ध वस्तीत काही व्यक्तींनी घरात […]
]]>सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/solapur-drought-crisis-vba-demands-drought-declaration-and-immediate-relief-for-farmers/
Mon, 07 Sep 2026 12:57:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20118सोलापूर : गेल्या तीन महिन्यांपासून अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, पशुपालक आणि व्यापारी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही जिल्ह्यातील नदी, धरणे, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात […]
]]>मडकी वस्तीत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सुजात आंबेडकरांची मुस्लिम समाजातील तरुणांशी संवाद
https://eprabuddhbharat.com/solapur-sujat-ambedkar-engages-with-muslim-youth-at-eid-e-milad-un-nabi-celebration-in-madki-vasti/
Thu, 27 Aug 2026 06:53:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19825सोलापूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूर शहरातील मडकी वस्ती येथे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाजबांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील नागरिक आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती. यावेळी सुजात आंबेडकर यांनी इस्लाममधील ‘मसावत’ म्हणजेच समता या संकल्पनेवर विचार मांडले. आंबेडकरवादी आणि मुस्लिम समाजाने एकत्र येणे हा […]
]]>वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/vba-womens-wing-inaugurates-new-branch-in-valsang-south-solapur/
Sat, 15 Aug 2026 07:34:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19481वळसंग (दक्षिण सोलापूर) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मौजे वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे १४ ऑगस्ट २०२६ रोजी ‘वंचित बहुजन महिला आघाडी’च्या नवीन शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले. हे उद्घाटन वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा श्वेताताई राजगुरु यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर […]
]]>शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!
https://eprabuddhbharat.com/vba-opposes-bot-proposal-to-hand-over-solapur-municipal-schools-and-public-land-demands-mayors-bungalow-be-sold-instead/
Sat, 15 Aug 2026 07:18:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19477सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा व मोक्याच्या सार्वजनिक जागा बीओटी तत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. तसेच घोषणा देखील देण्यात आले. “शाळा विकून पाणी नको; विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!” अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच पाणी पुरवठ्यासाठी निधी उभारायचा असेल तर शाळा, मैदाने […]
]]>शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/solapur-school-roof-collapse-vba-demands-fir-against-officials-contractor-and-headmaster/
Wed, 12 Aug 2026 12:25:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19437सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना […]
]]>मंडल आयोग विजय दिनानिमित्त सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम; RPI (A)च्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश
https://eprabuddhbharat.com/solapur-marks-mandal-vijay-diwas-rpi-a-leaders-join-vanchit-bahujan-aghadi/
Fri, 07 Aug 2026 13:39:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19270सोलापूर : मंडल आयोग विजय दिनानिमित्त ७ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने सामाजिक न्याय व समतेचा संदेश देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ओबीसी समाजबांधवांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अर्थात RPI (A)च्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वंचित […]
]]>माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट
https://eprabuddhbharat.com/malshiras-dalit-woman-farm-worker-shot-dead-vba-visits-bereaved-family-demands-swift-justice/
Mon, 13 Jul 2026 07:00:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18775सोलापूर : माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतात मजुरीचे काम करणाऱ्या उषा साठे या अनुसूचित जातीतील महिला मजुराची गोळी झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मृत उषा साठे यांचे कुटुंब मूळचे माळखांबी गावचे असून, मागील १० वर्षांपासून आरोपी सचिन देशमुख […]
]]>जनगणनेतून वंचित राहिलेल्या १२० भटके-विमुक्त कुटुंबांची तात्काळ घरगणना; मुशाफिरी यात्रेला सोलापुरात मोठे यश
https://eprabuddhbharat.com/mushafiri-yatra-success-120-nomadic-tribal-families-get-registered-in-census-at-solapur/
Mon, 15 Jun 2026 10:59:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18253सोलापूर : भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजाच्या घरगणना, जनगणना आणि SIR प्रक्रियेसाठी अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी आठ जिल्ह्यांतील ११० गावांमध्ये मुशाफिरी यात्रा काढली होती. या यात्रेच्या समर्थनार्थ भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समिती, सोलापूर शाखेच्या वतीने आज सोलापुरात घरगणनेपासून वंचित राहिलेल्या समुदायांच्या हक्कासाठी मुशाफिरी यात्रेचे आयोजन करून त्यांच्या घरगणना नोंदणीसाठी जोरदार आवाज उठवण्यात आला. या यात्रेला सोलापुरात […]