Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
November 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
       
सोलापूर : उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेला एआय (AI) डेटा सेंटर प्रकल्प रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना निवेदन देऊन प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढीखांबे आणि माढा विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्यावर अतिरिक्त भार पडून परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात १६५ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून १७५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्पासाठी पाण्याचे नियोजन करण्यापेक्षा शासनाने दुष्काळग्रस्त गावांच्या पाणीप्रश्नाला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली.

या प्रकल्पामुळे शेतकरी, कष्टकरी आणि मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीतीही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उजनी धरण परिसरातील हजारो मच्छीमार कुटुंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. प्रकल्पामुळे धरणातील पाण्याची गुणवत्ता आणि जलचरांवर विपरीत परिणाम झाल्यास मच्छीमारांच्या रोजगाराचा आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आधीच दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात लाखो लिटर पाण्याची गरज असलेला एआय डेटा सेंटर प्रकल्प उभारणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून हा प्रस्तावित प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtraPoliticalsolapurUjjani damVanchit Bahujan Aghadi
Previous Post

दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

Next Post

मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट
बातमी

मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

by mosami kewat
November 3, 2026
0

औरंगाबाद : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांची होणारी कथित छळवणूक, महार हाडोळा जमिनींची बेकायदेशीर विल्हेवाट आणि अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीच्या...

Read moreDetails
उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

November 3, 2026
दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

November 3, 2026
नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद ! 

नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद ! 

October 31, 2026
व्यवस्थेचे अंधळेपण आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे थैमान

व्यवस्थेचे अंधळेपण आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे थैमान

October 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home