Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

mosami kewat by mosami kewat
November 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट
       

औरंगाबाद : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांची होणारी कथित छळवणूक, महार हाडोळा जमिनींची बेकायदेशीर विल्हेवाट आणि अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या तिन्ही विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रश्नांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कथित बेकायदेशीर व्यवहारांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांतील अनेक महिला विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात आणि आर्थिक परिस्थितीनुसार त्याची परतफेड करतात. मात्र, शासनाने दुष्काळ जाहीर केल्यामुळे रोजगारावर परिणाम झाला असून अनेक महिलांना कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वापर केला जात असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. महिलांना रात्री-अपरात्री फोन करणे, घरी जाऊन धमकावणे आणि अपमानास्पद वागणूक देणे अशा प्रकारच्या तक्रारीही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. यावर जिल्ह्यातील सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी आणि खासगी सावकारी करणाऱ्यांची लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

तसेच, औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील महार हाडोळा जमिनींचा प्रश्न गंभीर बनला असून कोट्यवधी रुपयांच्या जमिनी हडप करण्यात आल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने उपस्थित केला. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून जमिनींच्या मालकी हक्कासंबंधीच्या कागदपत्रांची तपासणी करावी, दोषींविरुद्ध नियमानुसार गुन्हे दाखल करावेत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जमिनी मूळ हक्कदारांना परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या जमिनी आजी-माजी आमदार, खासदार तसेच उद्योजकांनी हडप केल्याचेही शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. अवैध मुरूम वाहतूक रोखण्यासाठी लिंबे जळगाव टोलनाक्यावर विशेष तपासणी पथक नियुक्त करावे, वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, तसेच या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि कथित गैरव्यवहारात सहभागी असलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. या तिन्ही विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करून समाधानकारक उत्तरे दिली आणि संबंधित प्रश्नांवर लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, जिल्हा महासचिव सूरज मुळे, जिल्हा संघटक राजन किर्तने, रवि रत्नपारखे, युवा पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे, सिल्लोड तालुकाध्यक्ष बनेखॉ पठाण, सोयगाव तालुकाध्यक्ष सचिन शिंदे आदींसह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Previous Post

उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट
बातमी

मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

by mosami kewat
November 3, 2026
0

औरंगाबाद : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिलांची होणारी कथित छळवणूक, महार हाडोळा जमिनींची बेकायदेशीर विल्हेवाट आणि अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीच्या...

Read moreDetails
उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

November 3, 2026
दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

November 3, 2026
नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद ! 

नांदेड येथील जय भीम GenZ  कार्यक्रमाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद ! 

October 31, 2026
व्यवस्थेचे अंधळेपण आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे थैमान

व्यवस्थेचे अंधळेपण आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे थैमान

October 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home