Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
November 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : महाराष्ट्रामधील सर्वच काही गुजरातला विकण्याचे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदणच दिले आहे, त्यावरच त्यांचं मुख्यमंत्री पद टिकून आहे. हे ते वारंवार दाखवत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. राज्यातील वृक्षतोड आणि AI डेटा सेंटर या संदर्भात त्यांनी मुंबई येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, सह्याद्रीची रेंज ही अत्यंत इकोसेन्सेटिव्ह आहे. केंद्र सरकारने युनेस्कोनेला हमी पत्र दिले आहे की, या भागात कुठल्याही प्रकारचे डेव्हलपमेंट होणार नाही. त्याचे कारण असे आहे की, सह्याद्रीच्या भागात अनेक नवीन जीव तयार होतात. सह्याद्रीच्या रेंजमध्ये ऑक्सिजन हे 70 टक्क्यांपेक्षा जास्त असते. या रेंजमध्ये काही पॉकेट असे आहेत जे पश्चिम महाराष्ट्र आणि इतर जैविक भागाला जीवदान आहे.“भांडवलदारांची मक्तेदारी असलेल्या भांडवलशाहीने भाजप या सत्ताधारी पक्षाला आपल्या खिशात ठेवल्याचे आम्हाला माहीत होते. मात्र, त्यांनी विरोधकांचीही मौन विकत घेतले आहे, हे आमच्या लक्षात आले नव्हते.” असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली.

भीमाशंकर येथे होत असलेल्या वृक्षतोडीवर त्यांनी संताप व्यक्त केला त्यांनी म्हटले की, टोरंटो सारखे 5 प्रोजेक्ट्स सह्याद्रीत सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या पदावरून लोकांना फसवत आहेत. हे सरकार सह्याद्रीचे वाळवंट करायला निघाले आहे.रायगडमध्ये आतापर्यंत 5 प्रोजेक्ट्स सुरू आहेत. यातून तीन चतुर्थांश रायगड जिल्हा बाधित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, भीमाशंकरची रेंज ही 15 किलोमीटर आहे. हे अंतर दाखवून त्यांनी वृक्षतोडीला खरं ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.प्रत्येक प्राणी, जनावरांचा एक झोन असतो, त्याबाहेर तो जात नाही. त्याला जर त्रास दिला तर तो त्यातून बाहेर पडतो. याचे उदाहरण आपण जुन्नर तालुक्यात बघतोय की, बिबट्याचा वावर आणि त्यातून होणारा त्रास आपण बघतोय. वृक्षतोडी संदर्भात आतापर्यंत सरकारने दिलेली आकडेवारी खोटी आहे, या प्रोजेक्ट्ससाठी अडीच लाख झाडं पाडली जाणार आहेत.

सरकारने दिलेल्या माहितीवर सुद्धा आंबेडकरांनी आक्षेप घेतला. राज्य सरकारला पाण्याचा प्रश्न असेल तर टाटा पॉवर हाऊसमधील पाणी पाताळगंगा नदीत सोडले जाते, ते पाणी पाईपलाईनने नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांना देता येईल. तेही पाणी कमी पडत असेल, तर पूर्वी कोयना धरणाचे अर्ध्यापेक्षा जास्त पाणी वीजेला वापरले जाते, ते पाणी कोकणाच्या दिशेने लेग टॅपिंग करून वळवले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी पाण्याच्या तुटवड्याची जी शक्यता सांगितली आहे, ती पूर्णपणे खोटी आहे. या दोन ठिकाणचे पाणी समुद्रात वाया चालले आहे. ते वाया चाललेले पाणी पाईपलाईन मार्फत वळवल्यास अर्ध्या किंमतीत पाण्याची टंचाई सोडवता येईल.मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेशी खोटे बोलत आहेत आणि जनतेला फसवत आहेत. असे त्यांनी म्हटले.

अमेरिकेतून सगळे डेटा सेंटर हाकलले जात आहेत. हे सगळे डेटा सेंटर अमेरिकन कंपन्यांचे आहेत आणि अमेरिकन जनताच हे डेटा सेंटर तिथून हाकलून देत आहेत. याचे कारण की, डेटा सेंटर याला थंड करण्यासाठी किमान अडीच हजार कोटी लिटर पाणी लागते. रायगड मध्ये जी एवढी धरणे बांधली जात आहेत, त्याचे कारण तिथे एक अमेरिकन कंपनीसोबत अदानीचा करार झाला आहे अशी माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.

टोरंट पॉवर यांनी राजकीय पक्षांना दिलेल्या निधी बाबतही त्यांनी उपस्थित केले. टोरंट पॉवर यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेतले आणि राजकीय पक्षांना दिले आहेत. भारतीय जनता पक्षाला टोरंट कंपनीने ७६ कोटी रुपये निधी दिला आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस यांना १७ कोटी रूपये निधी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ३.५ कोटी रुपये निधी दिला आहे. शिवसेनेला ३ कोटी रुपये निधी दिला आहे आणि आम आदमी पक्षाला ७ कोटी रुपये निधी दिला असल्याचा ॲड. आंबेडकरांनी उल्लेख केला.

तसेच, आसाम मधील सिलिगुडी मध्ये टोरंटो फार्मसीटीकल डोनेशन या कंपनीने सुद्धा इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतले आणि भाजपला ६१ कोटी रुपये निधी दिला, क्रांतिकारी मोर्चा यांना ७ कोटी रुपये निधी दिला, इंडियन नॅशनल काँग्रेस यांना ५ कोटी रुपये निधी दिला, समाजवादी पार्टी यांना ३ कोटी रुपये निधी दिला, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांना ५० लाख रुपये असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


       
Tags: BhimashankarMaharashtraPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadiकर्जत
Previous Post

मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

Next Post

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

by Akash Shelar
November 3, 2026
0

मुंबई : महाराष्ट्रामधील सर्वच काही गुजरातला विकण्याचे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदणच दिले आहे, त्यावरच त्यांचं मुख्यमंत्री पद टिकून...

Read moreDetails
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 3, 2026
मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

November 3, 2026
उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

November 3, 2026
दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

November 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home