Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला निर्बंध घालणारे परिपत्रक रद्द करण्यासाठी समविचारी विद्यार्थी संघटनांचे एकत्रित आंदोलन; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ताकदीने सहभाग!

mosami kewat by mosami kewat
November 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला निर्बंध घालणारे परिपत्रक रद्द करण्यासाठी समविचारी विद्यार्थी संघटनांचे एकत्रित आंदोलन; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ताकदीने सहभाग!
       

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनासंदर्भात काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ आज  विद्यापीठ परिसरात सर्व समविचारी विद्यार्थी संघटनांच्या वतीने एकत्रित आंदोलन करण्यात आले.

विद्यापीठाने काढलेल्या या परिपत्रकात विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनांवर निर्बंध घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला होता. या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची भूमिका विद्यार्थी संघटनांनी मांडली.

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड तसेच किरण सैंदाणे, हर्ष साळवे, राहुल रिकीबे, चैतन्य इंगळे, वैभव शिंदे, आर्यसत्य आंबेडकरी कार्यकर्ते श्रीकांत कांबळे ह्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग दाखवला तसेच विद्यार्थी संघटनांच्या एकत्रित लढ्याला पाठिंबा दिला.

तसेच एस.एफ.आय. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, सत्यशोधक विद्यार्थी आघाडी, पीपल्स रिसर्च स्कॉलर असोसिएशन, कॉक्रोज जनता पार्टी, शेतकरी क्रांतिकारी संघटना, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, वंचित बहुजन युवा आघाडी यांसह विविध समविचारी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत या आंदोलनात सहभाग घेतला.

या सर्व संघटनांनी एकत्रितपणे विद्यापीठ प्रशासनाकडे सदर परिपत्रक रद्द करण्याची ठाम मागणी केली. विद्यार्थ्यांना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा आणि आपले प्रश्न मांडण्याचा लोकशाही अधिकार अबाधित राहिला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्या संघटनांना पत्र देण्यात आले. दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परिपत्रकातील मागण्यांबाबत सकारात्मक फेरविचार करण्यात येईल, असे प्रशासनाने पत्राद्वारे कळविले आहे.


       
Tags: MaharashtrapuneSamyak Student MovementSavitribai Phule Pune University
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला निर्बंध घालणारे परिपत्रक रद्द करण्यासाठी समविचारी विद्यार्थी संघटनांचे एकत्रित आंदोलन; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ताकदीने सहभाग!
बातमी

विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला निर्बंध घालणारे परिपत्रक रद्द करण्यासाठी समविचारी विद्यार्थी संघटनांचे एकत्रित आंदोलन; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ताकदीने सहभाग!

by mosami kewat
November 3, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनासंदर्भात काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ आज  विद्यापीठ परिसरात सर्व समविचारी विद्यार्थी संघटनांच्या वतीने...

Read moreDetails
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 3, 2026
मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी, महार हाडोळा जमिनीचा प्रश्न आणि अवैध मुरूम उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

November 3, 2026
उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

November 3, 2026
दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

दुष्काळग्रस्त दलित वस्त्यांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल; समाजकल्याण आयुक्तालयाकडून प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर

November 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home