Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मंडल आयोग विजय दिनानिमित्त सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम; RPI (A)च्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

mosami kewat by mosami kewat
August 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मंडल आयोग विजय दिनानिमित्त सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम; RPI (A)च्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश
       

सोलापूर : मंडल आयोग विजय दिनानिमित्त ७ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने सामाजिक न्याय व समतेचा संदेश देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ओबीसी समाजबांधवांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अर्थात RPI (A)च्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर ७ ऑगस्ट हा ‘मंडल आयोग विजय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यानुसार सोलापुरात आयोजित चर्चासत्रामध्ये मंडल आयोगाचे सामाजिक न्यायासाठीचे योगदान, ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती आणि संघटन बळकटीवर चर्चा करण्यात आली.

यावेळी स्वामी ताई, मल्लिकार्जुन हिरेमठ, शाहिद शेख, अतिश भैय्या बनसोडे, शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार, शहर महासचिव विनोद इंगळे, शरीफ शेख, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुरेश देशमुख, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, विजय दादा उघडे आणि जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या औचित्य साधून RPI (A) दक्षिण सोलापूरचे उमाकांत बाबू येरवडे (माजी सरपंच), तालुका उपाध्यक्ष गणेश विक्रम कांबळे, सतीश आंबा येरवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमाला अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, यशवंत शेठ इंगळे, रोहित दादा थोरात, युवक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष अमर डोरके, राहुल शिंदे, विजय गायकवाड, सिताफळे, गौतम थापटे, श्रीनिवास संगेपान, सुहास दादा सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: MaharashtraPoliticalsolapurVanchit Bahujan Aghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्यात ७ ऑगस्ट ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिन म्हणून साजरा

Next Post

कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा

Next Post
कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा

कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा 'मंडल विजय दिवस' सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
बातमी

रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

by mosami kewat
August 27, 2026
0

यवतमाळ : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिका गटनेते व नगरसेवक...

Read moreDetails
म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !

म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !

August 27, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

August 27, 2026
लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

August 27, 2026
विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

August 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home