Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा

mosami kewat by mosami kewat
August 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा
       

कळमनुरी (जि. हिंगोली) : वंचित बहुजन युवक आघाडी, कळमनुरीच्या वतीने मंडल आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयाच्या स्मरणार्थ ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या आदेशानुसार आयोजित या कार्यक्रमात ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली.

शासकीय विश्रामगृह, कळमनुरी येथे झालेल्या कार्यक्रमात ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पत्रकार व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मंडल आयोग, सामाजिक न्याय आणि आजच्या काळातील ओबीसी चळवळीचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवा आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष योगेश नरवाडे होते. तर युवा नेते राजू कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

यावेळी ज्येष्ठ ओबीसी नेते खंडबराव नाईक, चंपतराव नाईक, लक्ष्मीकांत कस्तुरे, सुभाष कोकरे, सोनबाराव कोकरे, बापुराव महाजन, शिवाजी भूतनर, डॉ. अजय राठोड आणि साबेर अत्तार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे सामाजिक न्यायाच्या चळवळीला मिळालेली दिशा तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याची गरज अधोरेखित केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम, युवा तालुका महासचिव दिनेश पाईकराव, युवा तालुका उपाध्यक्ष राष्ट्रपाल कोकरे आणि युवा तालुका सचिव जयभीम डोंगरे यांनी केले.

यावेळी माथाडी तालुकाध्यक्ष जितेश कदम, गौतम दांडेकर, शंकर रणवीर, काशिनाथ मोगले, विनोद ढेपे, भगवान ढेपे, दादाराव खंदारे, धम्मपाल पाईकराव, गोविंद राऊत, सचिन हटकर, शीलवान नरवाडे, नथुराम खंदारे, सुशांत पाईकराव, गोविंद गवळी, नितीन घोडगे, आकाश मोगले, बबन खंदारे, शेख मोबिन, सलीम पठाण, प्रवीण पाईकराव, शेख अक्रम, शेख मुजीब, राजू दांडेकर, आनंदा मोगले, प्रकाश पाईकराव, अंबादास खिल्लारे, रामा दासुदकर, गौतम पतीगराव, गजानन पाईकराव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओबीसी चळवळीशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


       
Tags: HingoliMaharashtraMandal Vijay DiwasPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मंडल आयोग विजय दिनानिमित्त सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम; RPI (A)च्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

Next Post

कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद

Next Post
कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद

कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा 'मंडल विजय दिवस' अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home