Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
September 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
       

सोलापूर : गेल्या तीन महिन्यांपासून अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, पशुपालक आणि व्यापारी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही जिल्ह्यातील नदी, धरणे, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकांची उगवणच झालेली नसून, दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई व मदत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

पाणीटंचाईची परिस्थितीही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये २० ते २५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.

दरम्यान, पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे पशुधनासाठी तातडीने चारा छावण्या सुरू करून मुक्या जनावरांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याने शासनाने रोजगाराच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने अपर जिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: AgricultureCrop DamageFarmer crisisMaharashtraPoliticalsolapurVanchit Bahujan Aghadi
Previous Post

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

Next Post

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

Next Post
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; "शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या" वंचित बहुजन आघाडीची मागणी 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी
बातमी

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; दोन जण जखमी

by mosami kewat
October 18, 2026
0

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात ही...

Read moreDetails
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका

October 18, 2026
आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

आझाद समाज पार्टीला नाशिकमध्ये खिंडार! जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे संपूर्ण संघटनेसह वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर!

October 18, 2026
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

October 18, 2026
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home