Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट

mosami kewat by mosami kewat
July 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट
       
सोलापूर : माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे शेतात मजुरीचे काम करणाऱ्या उषा साठे या अनुसूचित जातीतील महिला मजुराची गोळी झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 

मृत उषा साठे यांचे कुटुंब मूळचे माळखांबी गावचे असून,  मागील १० वर्षांपासून आरोपी सचिन देशमुख याच्याकडे मजुरीचे काम करत होत्या. आरोपीने आर्थिक आणि जातीय मानसिकतेतून एका गरीब महिलेचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे. दलित महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराबाबत शासन आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे उदासीन असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली 

या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे. नसरापूर घटनेच्या धर्तीवर हा खटला चालवून ५० दिवसांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासनाने सक्षम सरकारी वकील नेमावा अशी मागणी केली. तसेच, आरोपीने हे शस्त्र कुठून आणले आणि या हत्येच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करून आरोपीची संपत्ती जप्त करण्याची मागणीही करण्यात आली. 

यावेळी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे माढा लोकसभा विभाग जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, सोलापूर चे विनोद इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप, प्रवीण वाघमारे नितीन सरवदे संदीप घाडगे अभिजीत गायकवाड , अक्कलकोट तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट तालुका अध्यक्ष साहिल कांबळे, तालुका उपाध्यक्ष यशवंत शेठ इंगळे, मनोज जगताप, सुनका जाधव, सागर लांडगे, संभाजी कांबळे  सावता भोसले, समाधान लांडगे राजू सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: crimeMaharashtraMalshiras Dalit Woman Farm Worker Shot DeadPoliticalsolapurwomens
Previous Post

कायदा कागदावरच : गटारातील मृत्यूंची शंभरी पार ; स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
बातमी

‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

by mosami kewat
July 13, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद मध्य शहराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी' या अभिनव उपक्रमाला...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

July 13, 2026
माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट

माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट

July 13, 2026
कायदा कागदावरच : गटारातील मृत्यूंची शंभरी पार ; स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

कायदा कागदावरच : गटारातील मृत्यूंची शंभरी पार ; स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

July 11, 2026
कॉर्पोरेटचे कार्टेल आणि मायक्रो-उद्योजकांचा चक्रव्यूह

कॉर्पोरेटचे कार्टेल आणि मायक्रो-उद्योजकांचा चक्रव्यूह

July 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home