]]>
वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक
https://eprabuddhbharat.com/vba-efforts-hingoli-shird-shahapur-zp-school-gets-6-new-teachers/
Sat, 05 Sep 2026 10:57:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20053हिंगोली : जिल्हा परिषद प्रशाला, शिरडशहापूर येथील शिक्षकांच्या गंभीर तुटवड्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा समन्वयक समाजरत्न अनिल कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून शाळेला तब्बल ६ नवीन शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गेल्या काही काळापासून शिरडशहापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा प्रश्न […]
]]>आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक
https://eprabuddhbharat.com/hingoli-samyak-vidyarthi-andolan-demands-action-against-mla-santosh-bangar-over-alleged-religious-promotion-in-schools/
Wed, 19 Aug 2026 07:59:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19602विद्यार्थ्यांच्या हातात ‘किताब’ द्या, तुमच्या राजकारणाचा ‘हिशोब’ नाही!हिंगोली : हिंगोलीत शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आमदार संतोष बांगर थेट शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक ‘कावड यात्रेसाठी’ जाहीर आवाहन करत सुटले आहेत. इतकेच नव्हे, तर ज्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे, तेच महाशय लाळघोटेपणा करत आमदारांचे […]
]]>फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी
https://eprabuddhbharat.com/vba-protest-against-guardian-minister-narhari-zirwal-over-neglect-of-public-issues-in-hingoli/
Sat, 15 Aug 2026 11:24:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19490कळमनुरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ कळमनुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. पालकमंत्र्यांनी केवळ ध्वजारोहणापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील जनतेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला होता. मात्र, आंदोलन […]
]]>कळमनुरी: वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे मूकबधिर विद्यालयात फळवाटप करून स्वातंत्र्यदिन साजरा
https://eprabuddhbharat.com/kalamnuri-vanchit-bahujan-yuva-aghadi-celebrates-independence-day-with-fruit-distribution-at-deaf-and-mute-school/
Sat, 15 Aug 2026 10:26:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19487कळमनुरी : हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शहरातील निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करत सामाजिक बांधिलकीचा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच समाजातील प्रत्येक घटकाप्रती आपली सामाजिक जबाबदारी जपली जावी आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. फळवाटपामुळे […]
]]>कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा
https://eprabuddhbharat.com/kalamnuri-marks-mandal-vijay-diwas-with-social-justice-and-equality-event/
Fri, 07 Aug 2026 13:52:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19273कळमनुरी (जि. हिंगोली) : वंचित बहुजन युवक आघाडी, कळमनुरीच्या वतीने मंडल आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयाच्या स्मरणार्थ ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या आदेशानुसार आयोजित या कार्यक्रमात ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली. शासकीय विश्रामगृह, कळमनुरी येथे झालेल्या कार्यक्रमात ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, […]
]]>वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात
https://eprabuddhbharat.com/vba-hingoli-district-workers-meet-new-taluka-committee-felicitation-party-rejoining/
Mon, 13 Jul 2026 07:40:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18779हिंगोली : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी हिंगोली (१२ जुलै) येथे आयोजित करण्यात आलेला जिल्हा कार्यकर्ता मेळावा आणि नूतन तालुका कार्यकारिणीचा सत्कार कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. या मेळाव्यात पक्षाची आगामी वाटचाल आणि संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजी खरात हे […]
]]>हिंगोलीला भूकंपाचा जोरदार हादरा; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट, घरांना तडे
https://eprabuddhbharat.com/hingoli-earthquake-3-5-magnitude-jolts-marathwada-houses-develop-cracks/
Sat, 11 Jul 2026 07:45:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18762हिंगोली : मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला शनिवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी शहरात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती भूमापक केंद्राने दिली आहे. (Hingoli Earthquake) या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरासह वसमत आणि औंढा नागनाथ परिसरातही जाणवले. अचानक झालेल्या हादऱ्यामुळे अनेक घरांमधील भांडी, खिडक्या आणि […]
]]>नीट पेपरफुटी प्रकरण: हिंगोलीत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे झळकले पोस्टर्स!
https://eprabuddhbharat.com/hingoli-students-demand-dharmendra-pradhans-resignation-over-alleged-neet-paper-leak-protest-posters-put-up/
Mon, 08 Jun 2026 07:16:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18081हिंगोली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने हिंगोली जिह्यात निषेधाचे पोस्टर लावण्यात आले. या पोस्टर आंदोलनाद्वारे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय […]
]]>वसमत येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा भव्य सत्कार; ‘गाव तिथे शाखा’ अभियान राबविण्याचा निर्धार
https://eprabuddhbharat.com/vba-felicitates-new-vasmat-taluka-committee-vows-village-to-branch-expansion-drive/
Thu, 04 Jun 2026 14:29:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18038हिंगोली : वंचित बहुजन आघाडीच्या वसमत तालुका नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. माजी तालुका अध्यक्ष उत्तम करवंदे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वसमत येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक रमेश भुजबळ यांनी प्रास्ताविक करत पक्षाची भूमिका आणि […]