हिंगोली : मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला शनिवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी शहरात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती भूमापक केंद्राने दिली आहे. (Hingoli Earthquake)
या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरासह वसमत आणि औंढा नागनाथ परिसरातही जाणवले. अचानक झालेल्या हादऱ्यामुळे अनेक घरांमधील भांडी, खिडक्या आणि पत्रे हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने घराबाहेर धाव घेतली.
Also Read : धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन
प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, काही ठिकाणी घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हिंगोली-वसमत परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने हा भाग भूकंपदृष्ट्या संवेदनशील ठरत आहे. त्यामुळे आजच्या हादऱ्यानंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Hingoli Earthquake)
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !
- संजीव चांदोरकर एसआयआर च्या तांत्रिक बाबी , १३ कोटी नागरिकांची नावे वगळली जाणे , दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक...
Read moreDetails






