Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

दिक्षाभूमी पार्कींगसाठी समाज कल्याणचा निधी !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 2, 2024
in सामाजिक
0
दिक्षाभूमी पार्कींगसाठी समाज कल्याणचा निधी !
       

झालेला अनाठायी खर्चाची वसुली ट्रस्टी आणि नागपुर सुधार प्रन्यासकडून करण्यात यावी.

तीन मजली मॉल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स सारखी रचना असलेली पार्किंग बांधकाम करण्याचा कुटील डाव दीक्षाभूमी ट्रस्टने रचला होता तो काल बहादुर आंबेडकरी अनुयायी ह्यांनी उधळून लावला त्या बद्दल सर्व सजग आंबेडकरी समूहाचे त्रिवार अभिनंदन. काल पवित्र दीक्षाभूमी वर झालेल्या उग्र आंदोलन ह्यामुळे सरकार बॅक फुटवर गेले आहे. सुरू असलेला पार्किंग लॉटचे कामाला स्थगिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात अत्यंत महत्वाची माहिती देखील दिली आहे. त्यांनी सांगीतले की, ट्रस्टने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आवश्यक निधीसह राज्य सरकारने मंजुरी दिली होती.अर्थात बोगस ट्रस्टी राजेंद्र गवई आणि सहकारी त्यांचा प्रस्तावित कामांशी संबंध नसल्याचा करीत असलेला दावा खोटा ठरला आहे.

हे कमर्शिअल बिल्डिंग सर्व ट्रस्टी आणि नागपुर सुधार प्रन्यास आणि भाजपाई ह्यांचे संगनमताने समाज कल्याण विभागाच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी केलेले षडयंत्र आता उघडकीस आले आहे. त्याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे दीक्षाभूमी पुनर्विकास प्रकल्प साठी समाज कल्याण विभागाचा निधी वळता करण्यात आला आहे! हयात भाजप – संघ आणि ट्रस्ट ह्यांची मिलीभगत असून त्याचा पुरावा म्हणजे दीक्षाभूमी, नागपूर येथील विकास कामांचे ई-भूमीपूजन मंगळवार दि. २४ ऑक्टोबर, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता झालेले भूमिपूजन. हया भूमिपूजन सोहळ्याची पोस्ट नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती तथा आयुक्त मनोज कुमार सुर्यवंशी यांनी त्यांचे फेसबुकवर शेयर केली होती. त्यानुसार उद्घाटन एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, परिवहन, महामार्ग विभाग, भारत सरकार, यांच्या प्रमुख उपस्थितीत व देवेन्द्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न झाले, असा उल्लेख आहे.मात्र त्यावेळी ट्रस्ट मधली मंडळी देखील उपस्थित होती. जगात कुठल्याही तीर्थक्षेत्राचे पार्किंग ची जागा ही त्या तिथक्षेत्राचे जागेत नाही.कारण जिथे मोठ्या प्रमाणत जनता येत असेल तिकडे ही पार्किंग व्यवस्था केलीच जावू शकत नाही.त्यामूळे राज्यात आणि देशात भक्त निवास व्यवस्था, भोजन आणि पार्किंग लॉट त्या त्या धार्मिक स्थळा पासून लांब निर्माण केले जातात.

दीक्षाभूमी वर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात जगभरातील जनता येत असते.त्यामुळे पार्किंग व्यवस्था तिकडे होऊ शकत नाही.हे ट्रस्ट ला माहित होते.थेट कमर्शिअल बिल्डिंग किंवा मॉल उभारला जाणे शक्य नसल्याने मागच्या दाराने ही अंडरग्राऊंड पार्किंगचे नावावर ही कमर्शिअल बिल्डिंग उभारली जात होती. ज्या नागपूर सुधार प्रन्यास कडे ही बांधकाम जबाबदारी दिली आहे त्या नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप करीत आंदोलन झाले आहे.अर्थात् ही सर्व मिली भगत आहे.

याच बरोबर आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की २०१५ साली मोदींनी इंदुमिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक भूमिपूजन केले होते.अडीच वर्षात तयार होणारे स्मारक नऊ वर्ष उलटली तरी पूर्ण झाले नाहीय.

काल आंदोलक आक्रमक होई पर्यंत ना सरकार दखल घेत होते ना ट्रस्ट नुसतीच टोलवा टोलवीची भूमिका होती. त्यांनी आंबेडकरी जनतेला हलक्यात घेतले होते. वेळ मारून नेत कमर्शिअल बिल्डिंग पूर्ण करण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले. तरीही आंबेडकरी समुहाने आता हा अनाठायी खर्चाची भरपाई ही ट्रस्टी आणि नागपुर सुधार प्रन्यास कडून करण्यात यावी अशी मागणी केली पाहिजे.कारण हा फंड समाज कल्याण विभागा कडून आलेला अनुसूचित जातीच्या हक्काचा निधी आहे.


       
Tags: DikshabhuminagpurPrakash AmbedkarRajendra PatodeVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दीक्षाभूमी ट्रस्टी लोकांच्या भावनांशी का खेळत आहे ?

Next Post

बौद्ध जनतेच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा परिणामाला समोरे जा – सिद्धार्थ मोकळे

Next Post
सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या  उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

बौद्ध जनतेच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा परिणामाला समोरे जा - सिद्धार्थ मोकळे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
काँग्रेस, बसप, बीआरएसपी कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश
बातमी

काँग्रेस, बसप, बीआरएसपी कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश

by mosami kewat
September 2, 2025
0

नागपूर : दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी तर्फे पक्षप्रवेश सोहळा व कार्यकारिणी मुलाखत बैठक उत्साहात पार पडली. या...

Read moreDetails
Gadchiroli : चामोर्शी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभा; गावपातळीवर पक्ष बळकटीचा निर्धार

Gadchiroli : चामोर्शी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभा; गावपातळीवर पक्ष बळकटीचा निर्धार

September 2, 2025
कर्जबाजारी शेतकरी आत्महत्याप्रकरणी पीडित कुटुंबाला मदत व नोकरी द्यावी – वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎‎‎‎

कर्जबाजारी शेतकरी आत्महत्याप्रकरणी पीडित कुटुंबाला मदत व नोकरी द्यावी – वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎‎‎‎

September 1, 2025
सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !

सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !

September 1, 2025
नांदेड शहरातील दोंदे मळ्यातील रस्त्याची दुरवस्था, वंचित बहुजन युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नाशिक शहरातील दोंदे मळ्यातील रस्त्याची दुरवस्था, वंचित बहुजन युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

September 1, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home