धुळे : शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि प्रशासकीय अनियमिततेविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले आहे. 12 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनात VBA नेत्यांनी अनेक गंभीर आरोप केले असून, या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा दावा केला आहे.
यावेळी बोलताना, VBA चे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनिअर मनोहर वाघ यांनी, ‘हे केवळ विकासकामांच्या अनियमिततेचे प्रकरण नाही, तर नागरिकांच्या घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे,’ असे सांगितले. नागरिकांना कलम 21 अंतर्गत जीवनाचा अधिकार आहे, ज्यामध्ये आरोग्य, सुरक्षित रस्ते, आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा समावेश होतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पारदर्शक कारवाई करून या समस्या सोडवाव्या, अशी मागणी त्यांनी केली.
या उपोषणादरम्यान, वंचित बहुजन आघाडीने अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. यापैकी प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
– कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले रुग्णालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.
– प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या निधीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, परंतु अद्याप या प्रकरणाची चौकशी झाली नाही.
– PWD क्र. 1 आणि 2 अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा आरोप आहे. कामांचा दर्जा निकृष्ट असूनही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
– जिल्हा परिषदेअंतर्गत चालणाऱ्या रस्ते व इतर बांधकाम कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
- अपंग आणि वृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनींवर अतिक्रमण होत असूनही महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.
– शिरपूर तालुक्यात मुरुम आणि वाळूचे बेकायदेशीर उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून, प्रशासनाकडून यावर अंकुश ठेवला जात नाही.
– आदिवासीबहुल भागांमध्ये आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ यांनी इशारा दिला आहे की, ‘जर जिल्हाधिकारी कार्यालयाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर हे आंदोलन केवळ शिरपूरपुरते मर्यादित राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांना शासन आणि प्रशासन जबाबदार असेल.’ या उपोषणात तालुका महासचिव सिद्धार्थ वाघ, दिनेश धनराज सर, संग्राम बनकर, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पीडित नागरिक सहभागी झाले आहेत.
सोलापूरला पुराचा धोका वाढला! हिप्परगा तलावातून ६०० क्युसेकने विसर्ग, नदी-नाल्यांना पूर
सोलापूर : पाच दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हिप्परगा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावाच्या उजव्या आणि डाव्या...
Read moreDetails