Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वसई-विरारमधील बेकायदा इमारत घोटाळा: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक

mosami kewat by mosami kewat
August 14, 2025
in बातमी
0
वसई-विरारमधील बेकायदा इमारत घोटाळा: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक

वसई-विरारमधील बेकायदा इमारत घोटाळा: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक

       

‎
‎पालघर :
नालासोपारा येथील ४१ बेकायदा इमारतींच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ED) बुधवारी मोठी कारवाई केली. यामध्ये वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्यासह एकूण चार जणांना ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
‎
‎मिळालेल्या माहितीनुसार, अटकेनंतर सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. ‘ईडी’च्या तपासानुसार, या घोटाळ्यात लाचखोरीची मोठी साखळी उघड झाली आहे. माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी प्रत्येक चौरस फुटामागे २० ते २५ रुपये, तर उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांनी प्रति चौरस फूट १० रुपये कमिशन निश्चित केले होते. या रकमेची वसुली एकूण प्रकल्पाच्या क्षेत्रफळावर आधारित होती.
‎
‎याच तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ईडी’ने पवार आणि रेड्डी यांच्यासह बिल्डर सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांनाही अटक केली आहे. हा संपूर्ण घोटाळा वसई-विरार महापालिकेतील अचोळे भागात डम्पिंग ग्राउंड आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर बेकायदा ४१ इमारती उभारण्याशी संबंधित आहे.
‎
‎स्थानिक प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी विकासकांशी संगनमत करून सामान्य नागरिकांची फसवणूक केली होती. या इमारती न्यायालयाच्या आदेशानंतर पाडण्यात आल्या होत्या. यापूर्वी, ‘ईडी’ने गेल्या महिन्यात पवार यांच्यासह अनेक संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. त्यात विरारमधील त्यांचा बंगला आणि मुंबई, नाशिकमधील निवासस्थानांचा समावेश होता. पवार यांची आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘ईडी’ने ही कारवाई केली होती.
‎
‎सर्वात आधी ‘ईडी’च्या छाप्यात उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या घरात तब्बल ३१ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्ट यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. याच तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरावर छापा टाकला असता, १ कोटी ३३ लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या घटनेमुळेच वसई-विरारमधील हा मोठा बांधकाम घोटाळा उघडकीस आला.


       
Tags: Anil Kumar PawarCommissionerEDpalgharVasai
Previous Post

शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Next Post

Solapur : वडवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

Next Post
Solapur : वडवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

Solapur : वडवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन
Uncategorized

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन

by Akash Shelar
November 7, 2026
0

पुणे : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाप्रती सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या...

Read moreDetails
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल ! 

November 6, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही

November 5, 2026
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

November 5, 2026
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home