Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

mosami kewat by mosami kewat
August 14, 2025
in बातमी
0
शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

शिरपूरमधील नागरिकांच्या समस्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

       

‎धुळे : शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि प्रशासकीय अनियमिततेविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले आहे. 12 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनात VBA नेत्यांनी अनेक गंभीर आरोप केले असून, या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा दावा केला आहे.
‎
‎यावेळी बोलताना, VBA चे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनिअर मनोहर वाघ यांनी, ‘हे केवळ विकासकामांच्या अनियमिततेचे प्रकरण नाही, तर नागरिकांच्या घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे,’ असे सांगितले. नागरिकांना कलम 21 अंतर्गत जीवनाचा अधिकार आहे, ज्यामध्ये आरोग्य, सुरक्षित रस्ते, आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा समावेश होतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पारदर्शक कारवाई करून या समस्या सोडवाव्या, अशी मागणी त्यांनी केली.

या उपोषणादरम्यान, वंचित बहुजन आघाडीने अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. यापैकी प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
‎
– कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले रुग्णालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

– प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या निधीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, परंतु अद्याप या प्रकरणाची चौकशी झाली नाही.
‎
– PWD क्र. 1 आणि 2 अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा आरोप आहे. कामांचा दर्जा निकृष्ट असूनही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
‎
– जिल्हा परिषदेअंतर्गत चालणाऱ्या रस्ते व इतर बांधकाम कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
‎
‎- अपंग आणि वृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनींवर अतिक्रमण होत असूनही महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.
‎
– शिरपूर तालुक्यात मुरुम आणि वाळूचे बेकायदेशीर उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून, प्रशासनाकडून यावर अंकुश ठेवला जात नाही.

– आदिवासीबहुल भागांमध्ये आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
‎
‎तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ यांनी इशारा दिला आहे की, ‘जर जिल्हाधिकारी कार्यालयाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर हे आंदोलन केवळ शिरपूरपुरते मर्यादित राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांना शासन आणि प्रशासन जबाबदार असेल.’ या उपोषणात तालुका महासचिव सिद्धार्थ वाघ, दिनेश धनराज सर, संग्राम बनकर, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पीडित नागरिक सहभागी झाले आहेत.


       
Tags: Collector officeDhuleprotestVanchit Bahujan Aghadi
Previous Post

Election commission : निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र; पण अद्याप उत्तर नाही!

Next Post

वसई-विरारमधील बेकायदा इमारत घोटाळा: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक

Next Post
वसई-विरारमधील बेकायदा इमारत घोटाळा: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक

वसई-विरारमधील बेकायदा इमारत घोटाळा: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चौघांना अटक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर
बातमी

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
August 24, 2026
0

पुणे : पुण्यात 22 ऑगस्ट रोजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता, यामध्ये मनुस्मृतीचा दाखला देत...

Read moreDetails
पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; हाय-व्होल्टेज सबस्टेशन व टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 24, 2026
देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!

August 24, 2026
Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार - राजेंद्र पातोडे

Amravati Hospital Fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला राज्याचे भ्रष्ट आरोग्य खाते जबाबदार – राजेंद्र पातोडे

August 24, 2026
Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Yasmin Shaikh : मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home