लातूर : वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) रेणापूर येथील संवाद दौरा आणि तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. युवक आघाडीचे प्रदेश सदस्य अमोल लांडगे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांनी भूषवले, तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर, रोहित सोमवंशी, लातूर तालुका अध्यक्ष सुनील कांबळे, रेणापूर तालुका अध्यक्ष आर.के. आचार्य, माजी तालुकाध्यक्ष खय्युम शेख आणि पुष्पाताई शिंदे यांसारखे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रेणापूर फाटा येथे मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर मोटारसायकल रॅली काढून सर्वजण तालुका संपर्क कार्यालयात पोहोचले. यावेळी मार्गदर्शनपर भाषणे झाली. मुख्य मार्गदर्शक अमोल लांडगे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद म्हणाले, “मुस्लिम, एस.टी., एस.सी., ओबीसी या वंचित समाजघटकांना न्याय देण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्यात आहे. त्यामुळे त्यांना ठामपणे साथ देणे गरजेचे आहे.”
महिला जिल्हाध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर आणि रोहित सोमवंशी यांनी १० व ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
तालुका अध्यक्ष आर.के. आचार्य यांनी प्रास्ताविक केले, तर कृष्णा वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. अतुल कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल मस्के, प्रकाश कांबळे, अहमद शेख, बाबासाहेब पवार, राजू चव्हाण, सम्राट गोडबाले आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. वंचित बहुजन आघाडी, भारिप, महिला आघाडी, युवक आघाडी आणि सम्यक आघाडीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'ओम शांति ओम' अशा...
Read moreDetails





