Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोल्हापूर : वंशाचा दिवा मुलगाच हवा, रूढी-परंपरांना फाटा देत लेकीने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग!

mosami kewat by mosami kewat
September 9, 2025
in बातमी
0
कोल्हापूर : वंशाचा दिवा मुलगाच हवा, रूढी-परंपरांना फाटा देत लेकीने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग!

कोल्हापूर : वंशाचा दिवा मुलगाच हवा, रूढी-परंपरांना फाटा देत लेकीने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग!

कोल्हापूर : ‘वंशाचा दिवा मुलगाच असावा’ या जुन्या सामाजिक परंपरेला छेद देत, कागल तालुक्यातील एका कन्येने आपल्या दिवंगत वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग देऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे. तिच्या या धाडसी निर्णयाचे आणि कार्याचे संपूर्ण गावात आणि परिसरात कौतुक होत आहे.
‎
‎केंबळी गावातील शेतकरी बाळूभाऊ कांबळे (वय ७३) यांचे मंगळवारी (दि.१९) सकाळी निधन झाले. बाळूभाऊंच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि तीन मुली होत्या; त्यांना मुलगा नव्हता. त्यांनी आयुष्यभर शेतमजुरी करून आपल्या मुलींना शिकवले, मोठे केले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांच्या तीन मुली, शीतल, प्रियंका आणि सारिका यांनी वडिलांची जबाबदारी स्वीकारली.
‎
‎वडिलांच्या निधनानंतर, तिन्ही बहिणींनी मिळून ‘आपणच वंशाचा दिवा आहोत’ असा विचार करत, वडिलांचे अंत्यसंस्कार स्वतःच्या हाताने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मधली मुलगी प्रियंका दीपक कांबळे यांनी वडिलांच्या मुखात पाण्याचे थेंब टाकले आणि त्यानंतर त्यांना अश्रूपूर्ण नयनांनी अग्निडाग दिला. प्रियंका या वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा महासचिव दीपक कांबळे यांच्या पत्नी आहेत.
‎
‎मुलींच्या या निर्णयामुळे आणि कृतीमुळे समाजात मुलींच्या समान हक्कांबाबत असलेला दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, असा संदेश दिला गेला आहे. ‘सावित्रीच्या लेकींनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले’ अशा भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. या घटनेचे सर्वत्र समाधान व्यक्त होत असून, मुलींच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: Daughters Last Ritesgender equalityGirl Child EmpowermentKolhapur NewsSocial Change
Previous Post

‎डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील गैरप्रकारांविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

Next Post

लातूरमधील रेणापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

Next Post
लातूरमधील रेणापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

लातूरमधील रेणापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home