Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

mosami kewat by mosami kewat
September 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल
       
राहुरी: राहुरी नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबांना निवासी जागा आणि शासकीय घरकुल योजना मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आदिवासींच्या बिऱ्हाड आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. 

वंचित बहुजन आघाडी आणि तिची आदिवासी विंग ‘एकलव्य वंचित आघाडी’ यांच्या वतीने ९ सप्टेंबर २०२६ रोजी राहुरी नगरपालिकेवर या बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

एकलव्य वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. गेल्या ५३ वर्षांपासून राहुरी शहरातील आदिवासी भिल्ल समाजातील एकाही कुटुंबाला हक्काचे घरकुल मिळालेले नाही; हे नागरिक खाजगी जागा, पाटबंधारे विभागाची जागा किंवा कचरा डेपोच्या परिसरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत आहेत. आदिवासी विकास महामंडळाचा निधी इतरत्र वळवला जात असल्याचा आरोप करत, नगरपालिकेने हद्दीत १५ ते २० एकर जमीन विकत घेऊन सर्व सुविधांसह शासकीय घरकुल योजना राबवावी, जेणेकरून घराचा, शिक्षणाचा, वीज व नळ कनेक्शनचा प्रश्न सुटेल, अशी प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. 

या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव (आबा), एकलव्य वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव, जिल्हाध्यक्ष संतोष दादा चोळके, जिल्हा संघटक बाबासाहेब साठे, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, महिला तालुकाध्यक्षा अनिताई जगधने, आयनुरताई पठाण, सय्यद मॅडम, नवनिर्वाचित अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा आशाताई माळी, कविताताई पवार, गणेश माळी, नारायण माळी, सिताराम माळी, पिंटू नाना साळवे, जितू बर्डे, प्रदीप गवळी, सुनिता बर्डे, शंकर बर्डे, रवी माळी यांच्यासह राहुरी शहरातील आदिवासी भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेतल्याने या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

Tags: MaharashtraPoliticalRahuriRahuri Adivasi Bhirhad Andolan
Previous Post

ठाणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय: ‘जय भीम GEN Z’ अभियानाच्या नियोजनासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना

Next Post

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

Next Post
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर
बातमी

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 1, 2026
0

मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जनआंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन...

Read moreDetails
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home