ठाणे: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीची बैठक ३ सप्टेंबर रोजी ठाणे येथे पार पडली. या बैठकीत ‘जय भीम GEN Z’ सह आगामी विविध अभियानांचे नियोजन आणि माध्यमांद्वारे जनसंपर्क वाढवण्यासाठी ९ सदस्यीय ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा नव्याने स्थापन झालेला ऍक्शन ग्रुप राज्य कोअर कमिटीसोबत थेट समन्वय साधून अभियानांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करेल. अभियानांच्या प्रभावी नियोजनासाठी वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सदस्यांना नियमित बैठकीसाठी आमंत्रित करून त्यांचा सक्रिय सहभाग व संवाद सुनिश्चित केला जाणार आहे.
या ‘VBA ऍक्शन ग्रुप-२०२६’ मध्ये दिशा पिंकी शेख, धैर्यवर्धन पुंडकर, फारुख अहमद, सिद्धार्थ मोकळे, उत्कर्षा रुपवते, तय्यब जफर, स्नेहल सोहनी, चेतन गांगुर्डे आणि सुमित आनंद या ९ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे आणि अभियाने माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी या समितीवर असणार आहे.






