Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

mosami kewat by mosami kewat
September 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर
       

अकोला : साकेत (अयोध्या) नगरी ही प्राचीन काळात बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र होती, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभाग प्रमुख तथा केंद्रीय शिक्षक प्रा. डी. एस. ननिर यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा अकोला यांच्या वतीने रविवार, ६ सप्टेंबर रोजी अशोक वाटिका येथे आयोजित प्रवचन मालिकेतील नववे पुष्प प्रा. ननिर यांनी गुंफले. यावेळी त्यांनी ‘साकेत नगरीचा खरा इतिहास’ या विषयावर प्रवचन दिले.

प्रा. ननिर यांनी सांगितले की, साकेत नगरीला प्राचीन काळात बौद्ध धम्माच्या प्रसाराचे महत्त्वपूर्ण केंद्र मानले जात होते. चिनी प्रवासी फाह्यन आणि ह्युएनसांग यांनी साकेतला भेट दिली होती. त्यांच्या प्रवासवर्णनांमध्ये बौद्ध धम्माशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण नोंदी आढळतात, असे त्यांनी नमूद केले.

ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संदर्भ तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे प्रा. ननिर यांनी विषयाचे सविस्तर विवेचन केले. विविध उदाहरणे देत साकेत नगरीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पैलू त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आद. पी. जे. वानखडे सर होते. यावेळी कोषाध्यक्ष विजय जाधव, महिला अध्यक्ष इंदुताई मेश्राम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका आणि बौद्धाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. मेश्राम, राहुल इंगळे, जी. जे. इंगळे, भीमराव मोहोड, डी. बी. शेगावकर, सदाशिव मेश्राम, प्रा. एस. पी. वानखडे, पंचशील गजघाटे, राहुल गोटे, जयदेव खंडारे, राजेश दारोकार, विशाल बावस्कर, प्रकाश शिरसाट, भाऊसाहेब थोरात, संतोष रायबोले, प्रवीण वानखडे, वैशालीताई गोटे, माऊली धांडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानगराध्यक्ष गोरखनाथ वानखडे यांनी केले. कांताताई थोरात यांनी प्रास्ताविक, तर प्रकाश शेगावकर यांनी आभार मानले. 


       
Tags: AkolaBhartiy Bauddh MahasabhaBuddhist Dhamma PropagationMaharashtra
Previous Post

राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

Next Post

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

Next Post
बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर
बातमी

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 1, 2026
0

मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जनआंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन...

Read moreDetails
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home